वालचंदनगर : पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांचा २००१ मध्ये खुन झाला होता. या खुनातील तीन आरोपींना हायकोर्टाने २००६ मध्ये इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, हे तीनही आरोपी वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींचा जामीन हायकोर्टाने रद्द करावा म्हणून वालचंदनगर बंद ठेवण्यात आले असताना अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केली. या कारणाने बारामती आगारातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना सहन करावा लागला. याप्रकरणी आगार प्रमुखांकडे चौकशी केली असता शासकीय महामंडळातील एस.टी बसवर कोणत्याही प्रकारचे कारण नसताना तोडफोड होत असल्यामुळे नुकसान होण्याऐवजी एसटी बस गाड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी (२५मे) दुपारी दोन वाजता पुन्हा प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्यात आल्याचे बारामती आगारातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:29 IST
जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती.
... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित
ठळक मुद्देएसटी बससेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना