शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

शहर गारठले!

By admin | Updated: March 4, 2015 00:49 IST

अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपल्यानंतर सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळी व सायंकाळी अनेक भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिंपरी : अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपल्यानंतर सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळी व सायंकाळी अनेक भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्री व पहाटेच्या तापमानात कमालीची घट झाल्याने लोक पुरते बेजार झाले आहेत. दिवसाचे तापमानही घटल्याने कडक उन्हातही गारठ्याचा परिणामी हिवाळ्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. ऋतुचक्रातील बदलाने हिवाळा लांबणीवर पडून आगामी पावसाळ्याच्या क्रमामध्ये फरक पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शनिवारी-रविवारी सपाटून पाऊस झाल्याने हवेतील बाष्पाचे दिवसाचे प्रमाण वाढले असून, ते २९.९९ वर पोहोचले आहे. कमाल तापमानात मागील दहा दिवसांचा विचार करता ३२ अंशांवरून २६.७ पर्यंत घसरण झाली आहे. तर किमान तापमानही १८ वरून १०.६ अंशांपर्यंत खाली आले आहे. याचबरोबर प्रतितास ५ किलोमीटरने हवा वाहत आहे. या वाऱ्यामुळे वातावरणातील गारठा अधिकच वाढत आहे. परिणामी नागरिकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही स्वेटर, उबदार कानटोप्यांचा वापर करावा लागत आहे. इतर वर्षांमध्ये मार्च महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागत असत. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत असत. मात्र या वर्षी याच्या अगदी उलट चित्र पाहण्यास मिळत आहे. सायंकाळी सहानंतरच गारठा प्रचंड जाणवत आहे. रात्री थंडीचे प्रमाण खूपच वाढत आहे. पहाटेपासूनच पवना नदीकाठालगतचा परिसर, शहरालगतच्या ग्रामीण भागातील सखल भागात धुके दाटल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कामगारांना थंडीचा त्रास सोसावा लागत आहे. पावसाने गवत आणि इतर जळणही भिजल्याने शेकोटी पेटविण्याची सोय राहिली नसल्याने थंडीचा कडाका सोसण्याखेरीज पर्याय उरला नाही. चहाचा व्यवसाय तेजीत४थंडीचा त्रास थोडा कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून चहाचा आस्वाद घेण्यास पसंती मिळत आहे. परिणामी हॉटेल, चहाच्या टपऱ्यांमध्ये व खास चहाच्या ठेल्यांवर समूहाने येणाऱ्यांचे प्रमाण दोन दिवसांत वाढल्याचा प्रत्यय येत आहे. परिणामी चहाविक्रेत्यांचा धंदा चांगलाच तेजीत आला आहे. इतर दिवसांच्या तुलनेत तिप्पट ग्राहक मिळत असल्याची प्रतिक्रिया पिंपरी येथील चहा विक्रेत्यांनी दिली.