शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभाग अभियंत्यांची बदली

By admin | Updated: July 14, 2016 00:35 IST

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहा कनिष्ठ अभियंत्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, दोन दिवसांत रुजू होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

पिंपरी : महापालिकेच्या नगररचना विभागातील सहा कनिष्ठ अभियंत्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, दोन दिवसांत रुजू होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश विभागप्रमुखांना दिला आहे. महापालिकेच्या ‘नगररचना आणि बांधकाम विभागातील रात्रीस खेळ चाले...’ यावर ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले होते. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही कार्यालय सुरू राहत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यातील अधिकारी आणि पदाधिकारी, वास्तुरचनाकार यांच्यातील साटेलोटे उघडकीस आणले होते. त्यानंतर सर्वसाधारण सभेत याबाबतचे प्रकरण गाजले होते. नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली होती. आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर या विभागाला सहानंतर टाळा लागत असल्याचे चित्र दिसून आले. राजकारणी आणि अधिकारी यांच्यातील लागेबांधे यामुळे या विभागात अनेकजण वर्षानुवर्षे एकाच जागेवर आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी सुरू असते. याबाबतच्या आलेल्या तक्रारींची गंभीर दखल आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतल्याची दिसून येत आहे. त्यामुळे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून नगररचना, बांधकाम परवाना विभागाविषयी तक्रारी वाढल्या होत्या. नगररचना विभागात सावळा गोंधळ सुरू असून, या विभागातील कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अनिता तापकीर यांनी आयुक्तांकडे केली होती. तसेच सर्वसाधारण सभेतही अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आणि एकाच जागेवर अनेक वर्षे ठिय्या मांडून असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी नगररचना विभागातील सन्मान भोसले, विजय लांडे, अशोक मगर, चेतन देसले, सचिन लोणे, बिपीन थोरमोठे या अभियंत्यांची बदली पाणीपुरवठा विभागात केली आहे. १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कार्यभार हस्तांतरण करून तसा अहवाल विभागप्रमुखांना सादर आहेत. (प्रतिनिधी)