शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचाही शहरात तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक कोरोनाची ...

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक कोरोनाची लागण झाल्यानंतर, प्राथमिक अवस्थेतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच ऑक्सिजन लावत आहेत. त्यामुळे बाजारातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसाला सव्वाशे ते दीडशे यंत्रांची मागणी नोंदविली जात आहे. परंतु, या यंत्राचा देखील तुटवडा निर्माण झाला असून वितरकांकडे त्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध नाही.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्राच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्याच्या किमतीही काही प्रमाणात वाढल्या आहेत. हे यंत्र हवेतून ऑक्सिजन खेचून घेते. बाजारामध्ये ५, ७, १० लिटरचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळतात. यातील ५ ते ७ लिटरच्या कॉन्सन्ट्रेटरला सर्वाधिक मागणी आहे. साधारणपणे ४० हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान या यंत्राच्या किमती आहेत. ही यंत्र पुरवणारे जवळपास ५० ते ६० वितरक आहेत. धोका नको म्हणून नागरिकांकडून खबरदारी म्हणून त्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याची खरोखरीच किती आवश्यकता आहे हे तपासणे आवश्यक आहे. परंतु, नागरिकांकडून भीतीपोटी आणि आवश्यकता नसतानाही हे यंत्र खरेदी केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

--/--

हे यंत्र विजेवर चालणारे, तसेच घरामध्ये सहज एका कोपऱ्यात मावणारे आहे. हे यंत्र सुरू केल्यानंतर त्याचा नेब्युलायझर तोंडाला लावावा लागतो. ५ लिटर ते १० लिटर ऑक्सिजन फ्लो असलेल्या यंत्राला अधिक मागणी आहे. ९९ टक्के यंत्रे ही परदेशातून आयात केलेली असतात.

----

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सकाळी आठ ते रात्रीपर्यंत दर पाच-दहा मिनिटाला या यंत्रासाठी कॉल येत आहेत. एरवी दिवसाला एखाददुसरे यंत्र विकले जात होते. आता मात्र, दिवसाला २० पेक्षा अधिक यंत्रांची मागणी आहे. यासोबतच ऑक्सिजन सिलिंडर किटची सुद्धा मागणी वाढली आहे.

- जयेश लाहोटी, सर्जिकल साहित्य वितरक

----

रुग्णालयांकडूनही मागणी

रुग्णालयामधून रुग्ण घरी सोडण्यापूर्वी वितरकांना संपर्क साधला जात आहे. रुग्णालयांकडून संबंधित रुग्णांना घरी सोडल्यावर या यंत्रांची आवश्यकता भासणार असल्याचे कळविले जाते. त्यामुळे जसे रुग्ण मागणी करीत आहेत; तशाच प्रकारे रुग्णालयांकडूनही मागणी वाढली आहे.

----

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र कोरोना रुग्णांसाठी सुचविण्यात आलेले नाही. परंतु, दर मिनिटाला पाच लिटरच्या आत ज्यांना ऑक्सिजन लागू शकतो अशा रुग्णांना ते काही प्रमाणात फायदेशीर ठरते. रुग्णाची प्रकृती त्यामुळे स्थिर राहण्यास मदत मिळते. हे यंत्र कोरोनाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत किंवा उपचारांनंतर घरी सोडल्यावर उपयोगी ठरू शकते. गंभीर रुग्णांना त्याचा उपयोग होत नाही.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका