शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

शहरामध्ये १०२८ कि. मी. पावसाळी गटारे बांधणार

By admin | Updated: May 22, 2017 06:46 IST

गेल्या काही वर्षांत शहरातील पावसाचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत. शहरात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक रस्त्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील पावसाचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत. शहरात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येते. या पार्श्वभूमीवर मलनि:सारण विभागाच्या वतीने शहरातील सुमारे १ हजार २८ किलो मीटर रस्त्यालगतची पावसाळी गटारे बांधण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ६४७.९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. शहरात रस्त्यांच्या कडेने पावसाळी गटारे जवळजवळ अस्तित्वात नसल्यासारखीच आहेत. यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येते व पाणी साठल्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडून पाणी साठल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवणे धोक्याचे होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत पावसाळ्यात अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. याशिवाय वाढत्या शहरीकरणामुळे अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून हे नाले बुजविण्यात आले आहेत. यामुळे हे नाले पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता अपुरे पडत आहेत. यामुळे महापालिकेच्या मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात नाल्याचे चॅनलायझेशन करण्याचे व रिटेनिंग वॉल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शहराचा स्टॉर्म वॉटर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये क्रॉस ड्रेनेज वर्क्स, रस्त्यालगतची पावसाळी गटारे बांधणे, नाला चॅनलायझेशन बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रमाणात कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. याच प्लॅनचा एक भाग म्हणून रस्त्यांच्या कडेने भूमिगत ड्रेनेजचे जाळे तयार करण्यात येणार आहे.