पिंपरी : पर्यावरण शिक्षण केंद्र बनविणे, आर्ट गॅलरी बनविणे, नदीसुधार प्रकल्प राबविणे, ग्रामीण भागामध्ये सोईसुविधा पुरविणे, बीआरटीमुळे होणारे तोटे व त्यामध्ये सुधारणा सुचविल्या. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी या योजनेबाबत नागरिकांचा अभिप्राय व मत विचारात घेण्यासाठी फ क्षेत्रीय कार्यालयाचे राजर्षी शाहूमहाराज सभागृह, निगडी येथे सभा झाली. या वेळी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, राहुल जाधव, अरुणा भालेकर, साधना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, क्षेत्रीय अधिकारी दिलीप गावडे, संगणक अधिकारी निळकंठ पोमण, प्रशासन अधिकारी विजय वाघमारे, प्रभागाचे कार्यक्षेत्रातील नागरिक व एनजीओ प्रतिनिधी आय एम मर्चंट, महेश माने, अनिल पालकर, सूर्यकांत मुथियान, रमेश माईसरे आदी उपस्थित होते.या वेळी नगरसदस्य व प्रभाग कार्यक्षेत्रातील नागरिक व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी पर्यावरण शिक्षण केंद्र बनविणे, आर्ट गॅलरी बनविणे, नदीसुधार प्रकल्प राबविणे, ग्रामीण भागामध्ये सोईसुविधा पुरविणे, बीआरटीमुळे होणारे तोटे व त्यामध्ये सुधारणा सुचविल्या. स्थापत्य, पाणीपुरवठा व विद्युत विभागाने एकमेकांशी समन्वय साधून विकासकामे पूर्ण करणे आदीबाबत मते नोंदविण्यात आली. संगणक अधिकारी निळकंठ पोमण यांनी स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात सादरीकरण केले. क्षेत्रीय अधिकारी दिलीप गावडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
> रस्ते सिमेंट-काँक्रिटचे तयार करणे, रोडच्या बाजूला असलेल्या टपऱ्या हटविणे, महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वाढ करावी, पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे यामध्ये मुख्यत: औषधी वनस्पती, वड, बांबू, पिंपळ इ. झाडे लावून वृक्षारोपण करणे, सोसायटीमधील ओल्या कचऱ्यांपासून खतनिर्मिती करण्याबाबत प्रशिक्षण देणे आदी अभिप्राय व मते नोंदविण्यात आली.