शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:37 IST

स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा नागरिकांची बैठक घेण्यात येईल. व्यापारी संघटनेने याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्याचे जाहीर केले आहे.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.स्मार्ट सिटी योजनेतच नागरिकांचा सहभाग गृहीत धरण्यात आला आहे. एखाद्या समस्येवर नागरिकांच्या प्रयत्नातून मात करणारी उपाययोजना व नंतर तिची अंमलबजावणी अशा विचारांना अनुसरूनच या दरमहा बैठका घेण्यात येतील. व्यापारी संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहर सल्लागार मंडळाची बैठक घेण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे तेव्हा उपस्थित होते, अशी माहिती जगताप यांनी दिली.औंध प्रभाग कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेही यात सहभागी होऊ शकतील. औंध प्रभाग कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत नागरिकांनी या कल्पनेचे स्वागत केले असून सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे.- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी

टॅग्स :Puneपुणे