शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Cinema: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागात‘गिरकी’

By नम्रता फडणीस | Updated: November 4, 2023 18:42 IST

Cinema: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘गिरकी’या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. .

- नम्रता फडणीस  पुणे -  गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘गिरकी’या मराठी चित्रपटाची निवडकरण्यात आली आहे. . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेले अमित सोनवणे वकवयित्री कविता दातीर या व्दयींनी ‘गिरकी’चे लेखन-दिग्दर्शन केले असून, निर्माता गणेश वसंत शिंदे हे पुणेस्थित उद्योजक असून, ‘गिरकी’हा निर्माताम्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.     दरवर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. त्यानुसार याचित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली जाते. यावर्षी एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव आले होते. समितीने केलेल्याशिफारसीनुसार ‘गिरकी’हा मराठी चित्रपट शासनातर्फे निवडण्यात आला आहे.

यासोबत बटरफ्लाय व ग्लोबल आडगाव या दोन चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे. निवड समितीत ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, कॅमेरामन समीर आठल्ये, अभिनेता संदीप पाटील यांचा समावेश होता. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाचा अधिकृत फिल्म फेस्टिवल असलेल्या पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये २०२३ रोजी ‘गिरकी’ची स्पर्धेसाठी निवड झाली होती. गिरकीने ‘बेस्ट डिरेक्टर ज्युरी मेन्शन’हा पुरस्कार पटकावला होता.‘गिरकी’हा ९५ मिनिटे लांबीचा चित्रपट आहे. प्रमुख भूमिकेत सुयश झुंझुरके व प्रमित नरके आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण रोशन  मरोडकर , संकलन अमित सोनावणे, म्युझिक सारंग कुलकर्णी व साऊंड डिजाईन हे नॅशनल अवॉर्ड विजेते महावीर साबण्णावर यांनी केलं आहे. २०१४ साली कविता दातीर यांनी ‘बबई ’नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. या शॉर्ट फिल्मचे जगभरातील चाळीसहून अधिक फेस्टिवल्समध्ये स्क्रीनिंग करण्यात आले. विविध फेस्टिवल्समध्ये पुरस्कारही मिळाले. त्याचबरोबर, तेलंगण राज्यामधील 'टूवर्ड्स अ वर्ल्ड ऑफ इक्वल्स : अ बायालिंग्वल टेक्स्टबुक ऑन जेंडर' या पदवी व अभियांत्रिकीच्या शासकीय महाविद्यालयांच्या विषयाच्या अभ्यासक्रमात 'बबई' या माहितीपटाचा समावेश करण्यात आला.लेखक-दिग्दर्शक कविता दातीर यांचा 'कविताच्या कविता' हा काव्य संग्रह २०१३ साली अक्षर मानवने प्रकाशित केला. ‘रात्र कडूझार होती..’हा आगामी कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाmarathiमराठी