शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

चोरट्यास वीस महिने कारावास, तिघांची सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:21 AM

कॅम्पमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरणाºया सराइताला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून २० महिने तुरुंगवास आणि ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी सुनावली.

पुणे : कॅम्पमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरणाºया सराइताला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून २० महिने तुरुंगवास आणि ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी सुनावली.आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय २२, रा. कासेवाडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातून तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील चोरीच्या पहिल्या घटनेत आरोपींनी ४९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. याप्रकरणी यास्मीन इस्माईल बागवान (वय ४१) यांनी खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. बागवान याचा भाजीविक्रीचा व्यवसाय असून, त्यासाठी ते २० डिसेंबर २०१६ रोजी घर बंद करून बाहेर गेले होते. परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तर, दुसरी घटना ही भवानी पेठेत १७ डिसेंबर २०१६ रोजी घडली होती. त्याप्रकरणी शकील अलीम मनियारी (वय २७, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली होती.फिर्यादी यांच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपींनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या दोन्ही प्रकरणांत आकाश आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती.आकाशला पहिल्या चोरीप्रकरणी ६ महिने साधा तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. तर, दुसºया चोरीप्रकरणी १४ महिने साधा तुरुंगवास आणि ३ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या असल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा