शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:22 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे.

- दीपक जाधवपुणे  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ही निवड तात्काळ रदद् न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.विद्यापीठातील इंग्रजी विभागात सहायक प्राध्यापक पदांच्या दोन जागांसाठी (एक वर्षाकरिता) नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी ६ मार्च रोजी मुलाखती पार पडल्या. एकूण १५ उमेदवारांनी या पदासाठी मुलाखती दिल्या. या दोन जागांवरील नियुक्या नुकत्याच जाहीर झाल्या. यातील खुल्या गटातील जागेवर निशा गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची पीएच.डी. नसतानाही विभागातील सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आल्याने पात्रताधारक उमेदवारांना धक्का बसला. डॉ. नितीन करमळकर यांचे स्वीय सहायक म्हणून विनोद गोसावी हे कार्यरत आहेत. त्यांच्या निशा गोसावी या बहीण आहेत, त्यामुळे वशिलीबाजीतून ही निवड झाल्याचा आरोप पात्रताधारक उमेदवार राज नेरकर, किरण मांढरे यांनी केला आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते, तरीही अपात्र उमेदवारांची निवड कशी झाली अशी विचारणा पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. पात्रताधारक उमेदवारांनी या निवडी विरोधात कुलगुरूंची भेट घेऊन तक्रार केली आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात सेट-नेट पात्रतेबाबत अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर निकाल देताना सहायक प्राध्यापकपदी सेट-नेट पात्र उमेदवारांची निवड करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ३ मार्च २०१९ रोजी याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निकाल दिला, असे राज नेरकर यांचे म्हणणे आहे.वशिलेबाजीचा आरोपइंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापकपदी निवडलेल्या महिला उमेदवार पात्रता पूर्ण करीत नव्हत्या. मुलाखत स्वत: कुलगुरुंनी घेतली. संबंधित महिलेचा भाऊ कुलगुरुंच्या कार्यालयात नोकरी करीत असल्याने वशिल्याने संबंधित महिलेची निवड झाली, असा आरोप पात्रताधारक उमेदवारांनी केला आहे.महाविद्यालयातील पदांवरही सेट-नेट पात्रताधारकचखेडयापाडयातील महाविद्यालयातही सहायक प्राध्यापक पदासाठी सध्या सेट-नेट उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड केली जाते. विद्यापीठात मात्र सेट-नेट पात्रतेचा निकष डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नियमानुसार प्रक्रिया पार पाडलीइंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापक निवडीची प्रक्रिया ही नियमानुसार राबविली आहे. यामध्ये कुठल्याही नियमाचा भंग झालेला नाही.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र