शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:10 IST

चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

पुणे : चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते सत्कार झाला. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सचिव शशिकांत सुतार आदी उपस्थित होते.संरक्षणमंत्री असताना चीनसोबत केलेल्या वाटाघाटींचा संदर्भ देत पवार म्हणाले, ‘१९९१ मध्येही चीनसोबत असेच तणावाचे वातावरण होते. त्या वेळी संरक्षणमंत्री म्हणून चीनसोबत वाटाघाटी करण्याचे काम माझ्याकडे होते. चीनच्या शिष्टमंडळाशी यशस्वी वाटाघाटी झाल्या, पण या चर्चेची माहिती चीनच्या पंतप्रधानांना सांगण्यासाठी चीनला जावे लागले होते. त्या वेळी चीनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी आर्थिक महासत्ता होण्यासाठी २५ वर्षे आम्ही कष्ट करणार असल्याचे सांगून, त्यानंतर आजूबाजूच्या विषयांकडे लक्ष देणार, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्याने, आता ते डोकलामच्या माध्यमातून आजूबाजूच्या विषयांकडे प्राधान्याने पाहत आहेत.’ भाई वैद्य म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाणांनंतर पवार यांच्याकडेच उत्तम प्रशासक म्हणून पाहता येईल.’

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन