शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीचा खून करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:19 IST

ताडीवाला रस्ता भागात टेम्पोत मृतावस्थेत सापडलेल्या सहा वर्षांच्या बालिकेचा गळा दाबून खून करणाºयास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे - ताडीवाला रस्ता भागात टेम्पोत मृतावस्थेत सापडलेल्या सहा वर्षांच्या बालिकेचा गळा दाबून खून करणाºयास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.गणेश बसवराज गायकवाड (मूळ रा़ गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ गीतांजली शाम वाघमारे (वय ६) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. तिची आई अंजली (वय ३०) हिने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंजली ताडीवाला रस्ता भागातील नंदादीप हॉटेलनजीक असलेल्या पदपथावर वास्तव्यास आहे. पुणे स्टेशन परिसरात ती मोलमजुरी करून निर्वाह करते. तीन दिवसांपूर्वी तिची मुलगी गीतांजली नंदादीप हॉटेललगत लावलेल्या टेम्पोत बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.ससून रुग्णालयात गीतांजलीच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे नमूद केले. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे निखिल जाधव यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली़ गायकवाड मूळ गावी पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले़ गायकवाड ४ जुलैला सायंकाळी टेम्पोजवळ झोपला असताना गीतांजली तिथे खेळत होती़ त्याने तिला शांत बसायला सांगितले़ पण तरीही ती तेथेच खेळत राहिल्याने त्याने नशेत तिचा गळा आवळला़ त्यात तिचा मृत्यू झाला़ लहान मुलीचा खून झालेला असताना खुनाचे नक्की कारण व खून करणाºयाबाबत काहीही खात्रीशीर माहिती नसताना पोलीस कर्मचारी निखिल जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक केली़

 

 

टॅग्स :ArrestअटकPuneपुणे