शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:18 IST

कांदा, बटाट्याची आवक वाढून भाव घटले, चाकण बाजारात ४ कोटी ९० लाख रुपयांची उलाढाल

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरची आवक वाढली. मात्र, पावसामुळे भाज्यांच्या किमती उतरल्या. कांद्याची आवक वाढून भाव २१ रुपयांनी घटले. बटाटा आवक ९८२ क्विंटलने वाढली. भाव स्थिर राहिले. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात बकरी ईदच्या सणामुळे विक्रीसाठी ३५०० बोकडांची आवक झाली. त्यापैकी २५०० बोकडांची उच्चांकी विक्री होऊन बोकड बाजारात तीन कोटींची उलाढाल झाली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बोकडांचा बाजार सकाळी ६ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत चालू होता. बोकडांच्या विक्रीतून बाजार समितीला तीन लाखांचे उत्पन्न झाले असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ७६० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव १२३० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक २७८२ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९८२ क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव १७०० रुपये झाला. या सप्ताहात भुईमूग शेंगांची आवक २० पोती झाली. लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव २ हजार ५०० रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ पोती झाली. मिरचीचा भाव ३००० रुपयांवर स्थिर झाला.राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ४,१५००० जुड्यांची आवक होऊन २०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ३ लाख ८५ हजार जुड्यांची आवक होऊन १०१ ते ५०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक ७०००० जुड्या झाली. २०१ ते ४०० रुपये असा जुड्यांना भाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव रुपयांत असे :कांदा - एकूण आवक - ७६० क्विंटल. भाव क्रमांक १ : १२३०, भाव क्रमांक : ९५०, भाव क्रमांक ३ : ६००. बटाटा - एकूण आवक - २७८२ क्विंटल. भाव क्रमांक १ : १७००, भाव क्रमांक २ : १५००, भाव क्रमांक ३ : १२००. लसूण - एकूण आवक - २० क्विंटल. भाव क्रमांक १ : २५००, भाव क्रमांक २ : २०००, भाव क्रमांक ३ : १८००. भुईमूग शेंग आवक २० क्विंटल, भाव क्रमांक १ : ५३००, भाव क्रमांक २ : ४०००, भाव क्रमांक ३ : ४५००.पालेभाज्या :पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव रुपयांत असे :मेथी - एकूण १७४५० जुड्या (२०० ते ५००), कोथिंबीर - एकूण २३९०० जुड्या (२०० ते ४००), शेपू - एकूण ८४७० जुड्या (२०० ते ४००), पालक - एकूण ५८४० जुड्या (२०० ते ३००).फळभाज्या :फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १० किलोसाठी डागांना मिळालेले भाव रुपयांत असे :टोमॅटो - ११४० पेट्या (६०० ते १४००), कोबी - ३२० पोती (५०० ते १०००), फ्लॉवर - ४५० पोती (५०० ते ८००), वांगी - ६१५ - पोती (१००० ते २०००), भेंडी - ५४५ पोती (१५०० ते २५००), दोडका - २८६ पोती (२००० ते ३०००), कारली - ४६९ डाग (१५०० ते २५००), दुधी भोपळा - २३५ पोती (५०० ते १०००), काकडी - ३४५ पोती (५०० ते १२००), फरशी - १५० पोती (१००० ते २०००), वालवड - ३८५ पोती(१५०० ते ३५००), गवार - २९० पोती (२००० ते ३०००), ढोबळी मिरची - ३९० डाग (१५०० ते २५००),चवळी - १४२ पोती (१००० ते २०००), शेवगा - ९५ डाग (३५०० ते ४५००).

टॅग्स :vegetableभाज्याChakanचाकण