शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

लक्ष्मीनगर मधील मुलांनी उलगडली ''माझी वस्ती ''

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 20:19 IST

टवाळखोरी, अंधश्रध्दा, मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे या घटना देखील चित्रप्रदर्शन तसेच मुलाच्या सादरीकरणात दिसून आले. 

ठळक मुद्देप्रदर्शन व सादरीकरण  

पुणे : कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीजवळच्या लक्ष्मीनगर येथे वसाहतीतील मुलांनी चित्रप्रदर्शन व सादरीकरणच्या माध्यमातून आपल्या वसाहतीतील भावविश्व लोकांसमोर उलगडले. पालकनीती परिवाराच्या खेळघर या मागील २२ वर्षांपासून येथे कार्यरत असलेल्या संस्थेच्या माझी वस्ती या विषयावरील सादरीकरणानिमित्त येथे सर्व जण जमले होते.      लक्ष्मीनगर हे कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी जवळील सुमारे दोन हजार लोकांची वसाहत. शहराच्या इतर वसाहतींमध्ये असतात, तसेच रोजच्या समस्या इथेही ठरलेल्याच. येथील मुलेही इतर मुलांप्रमाणेच विकसित व्हावीत, अभ्यासात नीतीमूल्यात मागे पडू नये यासाठी खेळघर या संवाद गटाच्या माध्यमातून अभ्यास वर्ग घेऊन प्रसंगी पालकांचे समुपदेशन करून मुलांच्या विकाससाठी केला गेलेला प्रयत्न म्हणजे खेळघर.   यावेळी प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रामधून लहान मुलांनी येथील समस्या तसेच चांगल्या गोष्टीही मांडल्या. येथील जुनी पत्र्याच्या घरे आपले रुपडे बदलत पक्क्या घरात बदलत आहेत. भरपूर पाणी आणि ड्रेनेज समस्या आता संपली आहे. याबरोबरच येथील टवाळखोरी, अंधश्रध्दा, मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे या घटना देखील चित्रप्रदर्शन तसेच मुलाच्या सादरीकरणात दिसून आले.     येथील मुलांनी आपली वस्ती कशी असावी यावर देखील त्यांच्या नजरेतून भाष्य केले. येथे पार्किंग स्लॉट, रुंद रस्ते, खेळायला मैदान, मुलींवरची कमी बंधने, वस्तीची आतूनही चांगली स्वच्छता, घरात भांडणे नसावीत, दारूबंदी आदी प्रमुख मागण्या त्यांनी सादर केल्या. खेळघराच्या माध्यमातून लहानाचे मोठे झालेले व आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या युवकांनीही मनोगत व्यक्त केले. परशुराम १२ वीत चांगल्या गुणांनी पास झाला. हनुमंत मोहिते यास बांधकाम अभियंता होण्यासाठी पहिल्या परदेशवारीसाठी खेळघरानेच मार्गदर्शन केले होते.  प्रिया बग्गी हिने वस्तीतील मुलींच्या समस्यांना वाचा फोडली. मोठ्या बहिणींवर लहान मुलांची व  घराची जवाबदारी, त्यातून शाळा सुटणे किंवा १० पर्यंतही न पोहोचणे व लवकर लग्न आदी घटनाक्रम तिने ओघवत्या शैलीत उलगडला.        शेवटी खेळघराच्या माध्यामातून मुलांना हसत खेळत शिक्षण तसेच शिकण्याची गोडी निर्माण करण, क्षमतांचा, विचारांचा व मूल्यांचा सातत्याने विकास करण याचेच विवेचन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले.     

.......

शुभदा जोशी, समन्वयीका, खेळघर – पालकनीती परिवाराच्या “खेळघर” या प्रकल्पात अजूनही भरीव कामे करण्यास वाव आहे. मुख्य म्हणजे इतकी वर्षे कामे करून, मुलांमध्ये सकरात्मक बदल पाहूनही अजूनही बरेच पालक व मुले या प्रकल्पास कमी प्रतिसाद देतात. सामाजिक आर्थिक बाबीशी झगडत हे काम पुढे नेत आहोत. येथील अनेक यशस्वी युवक, मुलांमधील सकारात्मक बदल, त्यांच्या क्षमतेत झालेली वाढ बघून मात्र आमच्या सहकार्‍यांना अधिकाधिक ऊर्जा मिळत राहते.  

टॅग्स :kothrudकोथरूड