शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यांच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:44 IST

महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे.

पुणे - महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता वाड्यांच्या एक हजार चौरस मीटर (१० गुंठे) किमान क्षेत्रात पुर्नविकासाला मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिले.महापालिकेच्या विकास आराखड्यात दाटवस्तीची क्षेत्रे दर्शविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने जुनी गावठाणे आणि मध्यवर्ती पेठांचा समावेश आहे. या भागात अनेक जुने वाडे असून त्यांची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यांच्या पुनर्विकासात अडथळे येत असल्याने या भागासाठी क्लस्टर रिडेव्हलपमेंट ही संकल्पना विकास आराखड्यात प्रस्तावित केली होती. यासाठी ३ एफएआय मंजूर करण्यात आला होता. मात्र, शासनाने जानेवारी २०१७ मध्ये या विकास आरखड्यास मान्यता देताना, क्लस्टर रिडेव्हलपमेंट चा निर्णय घेतला नव्हता. या संदर्भांत शासनाने या धोरणाचा इम्पॅक्ट एॅसेसमेंट रिपोर्ट तायर करून पाठविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या.महापालिकेने निश्चित केलेल्या या धोरणावर राज्यशासनाने काही महिन्यांपूर्वी मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेने क्लस्टरसाठी निश्चित केलेले क्षेत्र हे कमी असल्याने नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर किमार ४ हजार चौरस मीटर जागेसाठी ही योजना प्रस्तावित करावी त्यासाठी महापालिकेने या दोन्ही शहरांच्या धोरणाच्या आधार घ्यावा अशा सूचना नगर विकास विभागाने महापालिकेस केल्या होत्या. मात्र, शहरातील वाडयांचे आकारमान लहान आहे. तसेच मध्यवर्ती भागातील शहरातील रस्तेही लहान आहेत. अशा स्थितीत पुणे शहराचा स्वतंत्र विचार करून १ हजार चौरस मीटर किमान क्षेत्राबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणे