शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

मुख्यमंत्रीच घेणार प्रलंबित शिष्यवृत्तीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:44 IST

मंत्रालयातून आदेश देवूनही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत आढावा बैठक बोलविली आहे. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील प्रलंबित शिष्यवृत्तीची माहिती येणार समोर पुणे जिल्ह्यात राज्यातील एकूण शिक्षण संस्थांपैकी सुमारे ५० टक्के शिक्षण संस्था

पुणे : समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व शिक्षण संस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, मंत्रालयातून आदेश देवूनही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत आढावा बैठक बोलविली आहे. त्यामुळे समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. समाज कल्याण विभागाने सिंहगड इन्स्टिट्यूटचेच नाही तर पुण्यातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांची शिष्यवृत्तीची रक्कम थकवली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. तसेच राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.दिलीप कांबळे यांनी येत्या २१ जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक बोलविली आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाने किती शिक्षण संस्थांंची शिष्यवृत्तीची रक्कम थकवली हे समोर येणार आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटची शंभर कोटीहून अधिक शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण विभागाकडे प्रलंबित होती. त्यावर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम सिंहगड इन्स्टिट्यूटला देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र,पुण्यातील अनेक संस्थांचे कोट्यवधी रुपये समाज कल्याण विभागाने रखडवले आहेत. त्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीसह,शिक्षण प्रसारक मंडळी,महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था तसेच वाडिया कॉलेज आदी शिक्षण संस्थांचा समावेश आहे. राज्यातील एकूण शिक्षण संस्थांपैकी सुमारे ५० टक्के शिक्षण संस्था एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत.त्यामुळे जिल्हातील शिक्षण संस्थांना दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीची रक्कम सर्वाधिक आहे.मात्र,काही शिक्षण संस्थांची रक्कम २००७ पासून थकली आहे.विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होवून गेल्यानंतरही त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचा समाज कल्याण विभागाच्या कार्यपध्दतीवरचा विश्वास उडाला आहे.राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी डीबीटी पोर्टल सुरू केले होते. मात्र,पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याने शासनाला पुन्हा जुन्याच पध्दतीने शिष्यवृत्तीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली. पुणे जिल्हा समाज कल्याण कार्यालयात कर्मचा-यांची संख्या कमी असून कामाचा ताण अधिक आहे. त्यातच केवळ शिष्यवृत्ती योजना राबविण्याची जबाबदारी या कर्मचा-यांवर नाही तर जिल्ह्यातील शासकीय वसतीगृह चालविण्याचे कामही येथील कर्मचा-यांना करावे लागते. इतर राज्यांच्या तुलतेन पुणे जिल्ह्याकडे कामाचा व्याप जास्त आहे.परिणामी उपलब्ध कर्मचा-यांकडून काम करून घेणे अवघड जाते. त्यामुळे महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचा-यांची मदत घेवून प्रलंबित कामाचा निपटारा केला जात आहे.त्यात स्वत: मुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याने कार्यालयातील कामाला वेग आला आहे..................जिल्हा कार्यालयात आयुक्त ठाण मांडून राज्याचे समाज कल्याण मिलिंद शंभरकर यांचे कार्यालय पुणे स्टेशन परिसरात आहे.मात्र,गेल्या काही दिवसांपासून अर्धा दिवस शंभरकर हे स्वत: पुणे जिल्हा कार्यालयात येवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हजर असतात.त्यात आता येत्या २५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील प्रलंबित शिष्यवृत्तीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक बोलवली आहे. गेल्या आठवड्यात किती प्रकरणे निकाली काढली गेली याबाबतची माहिती या बैठकीत घेतली जणार आहे,असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDilip Kambleदिलीप कांबळेsinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युट