पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज (सोमवारी) पुण्यात ४ सभा होणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.देवेंद्र फडणवीस यांची सायंकाळी ५.३० वाजता बाणेर येथील माऊली मंगल कार्यालयाजवळ सभा होणार आहे. त्यानंतर ६.१५ वाजता डहाणूकर सोसायटीच्या मैदानावर सभा होईल. सायंकाळी ७ वाजता सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स येथे सभा होईल. रात्री पावणे आठ वाजता हडपसर येथील शिवसाम्राज्य चौकात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका सोमवारपासून सुरू होणार आहे. या सभांमधून सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर जोरदार तुटून पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री प्रचारसभांसाठी आज पुण्यात
By admin | Updated: February 13, 2017 02:28 IST