शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर पर्यटन तालुका घोषित करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:49 IST

जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय झाला असून दोन दिवसात याबाबत अध्यादेश काढण्यात येणार  असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जुन्नर : जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय झाला असून दोन दिवसात याबाबत अध्यादेश काढण्यात येणार  असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. 

शिवजन्मस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हालवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, जी.प.अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण , शिवजन्मभूमी संवर्धन  समितीचे कार्यवाह रविंद्र काजळे , नरेंद्र तांबोळी , विभागीय आयुक्त चंदकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस महापरिक्षेत्र आधिकारी आधिकारी विश्वास नांगरे, तहसीलदार किरण काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा साजरा   करण्यात आला. 

शिवकुंज स्मारकातील बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास  देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व मान्यवरांनी  अभिवादन केले.  शिवजन्मस्थळापासून शिवकुंज स्मारकपर्यंत  बालशिवबाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवरायांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.  मुंबई येथे कार्यक्रम असल्याने कोणतेही भाषण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ यांनी लगेचच मुंबईला प्रयाण केले. 

प्रवेश पास काढण्याच्या सक्तीने नाराजीमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी शिवनेरीवर येणाºया शिवभक्तांना आगाऊ प्रवेशाचे पास काढण्याच्या पोलिसांच्या सक्तीने शिवप्रेमीमध्ये  मोठी नाराजी वयक्त करण्यात येत होती. प्रवेशपास नसलेले हजारो शिवप्रेमी किल्याच्या पायथ्याशी खोळंबून बसले होते. मुख्यमंत्री व मान्यवरांचे गडावरून प्रस्थान झाल्यानंतर राज्यातून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर  सोडण्यात आले. त्यानंतर मात्र गडावर मोठी गर्दी ऊसळली.