शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:33 IST

Mahatma Phule skill development training centers: महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे एक कार्य म्हणून केंद्र शासनाचा म. जोतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ होत आहे.

 जेजुरी (जि. पुणे) - महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे एक कार्य म्हणून केंद्र शासनाचा म. जोतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ होत आहे. भविष्यात या उपक्रमांतर्गत राज्यात एक हजार प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खानवडी (ता. पुरंदर) येथे केली.

महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या खानवडी येथे फुलेंच्या द्विशताब्दीचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या ज्योती-सावित्री शाळेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार, अधिकारी उपस्थित होते. 

शाळेच्या उभारणीची संकल्पना अजितदादांची...मुख्यमंत्री म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सीबीएससी बोर्ड असणारी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणारी ही राज्यातील पहिली शाळा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतील या शाळेत सध्या २६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.भविष्यात २८० विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि सुमारे १,८४० विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची सोय होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘शाळेच्या उभारणीची संकल्पना अजितदादा पवार यांची होती. त्यांनीच शाळेचे भूमिपूजन केले होते. म. फुलेंच्या जन्मगावी ही शाळा व्हावी, असा त्यांचा आग्रह होता. आज तो पूर्ण झाला आहे.

मंत्री भुजबळ यांचे हेलिकॉप्टर वाहनतळावरच उतरले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम स्थळी आले. मात्र, ते वाहनतळावरच उतरवण्यात आले. यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाली. भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला योग्य ती सूचना मिळाली नसल्यामुळे हा प्रकार झाला. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड झाले तेथे पार्क केलेली असंख्य वाहने, शेजारी हाय व्होल्टेज विद्युत तारांचे खांब. सुदैवाने अनुचित घटना घडली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Establish 1000 Mahatma Phule Skill Development Training Centers

Web Summary : Maharashtra will establish 1000 Mahatma Phule skill development centers. The initiative, announced by Chief Minister Fadnavis, coincides with Phule's bicentennial. A new school in Phule's birthplace was also inaugurated.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार