शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पुण्यातील '' या '' उद्यानामध्ये घडणार छत्रपती संभाजी महाराजांचे '' ज्ञानवंत '' दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:26 IST

संभाजी महाराजांच्या शौर्यासह त्यांच्यातील कवीचे दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांना होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये हे शिल्प बसविले जाणार आहे

ठळक मुद्देबुधभूषण ग्रंथ लिखाण : भव्य कलाकृतीसाठी लागले दोन टन ब्रॉंझ

- लक्ष्मण मोरे- 

पुणे : श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजतेयदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज छत्रपते: यद्त्रोपरिलेखितंअशी स्वकर्तृत्वाला साजेशी राजमुद्रा धारण करणाऱ्या राजकारण धुरंधर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे काम पूर्ण झाले असून जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये हे शिल्प बसविले जाणार आहे. असामान्य शौर्य गाजविणाऱ्या संभाजी महाराजांच्या मनाचा एक हळवा कोपरा काव्याने भारलेला होता. राजकारणावरील बुधभूषण ग्रंथ आजही त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाची साक्ष देतो आहे. संभाजी महाराजांच्या शौर्यासह त्यांच्यातील कवीचे दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांना होणार आहे. महापालिकेच्यावतीने संभाजी उद्यानामध्ये नुकतीच ऐतिहासिक धाटणीची दगडी कमान बांधण्यात आलेली आहे. या कमानीवर छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा कोरण्यात आलेली आहे. तसेच चार हत्तींना पायाखाली तसेच एका हत्तीला शेपटीमध्ये जखडून ठेवलेल्या सिंहाची प्रतिकृती कोरण्यात आलेली आहे. पाच पातशाह्यांना आपल्या अधिपत्याखाली ठेवणारी मराठेशाही असा त्याचा अर्थ आहे. याच कमानीमधून आत गेल्यानंतर उद्यानामध्ये पुतळ्याच्या बारा फुट उंचीच्या चौथऱ्याचे काम सुरु आहे. याठिकाणी संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक उभे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. 

विधान परिषद आमदार निधीमधून या स्मारकाची उभारणी केली जात असून याठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असेच शिल्प बसविण्यात येणार आहे. अत्यंत सुबक आणि देखण्या असलेल्या शिल्पाची अनेक वैशिष्ट्ये असून तब्बल दोन टन ब्रॉंझ यासाठी लागले आहे. संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. यासोबतच त्यांनी सक्षम केलेले गुप्तहेर खाते, स्वराजासाठी घेतलेले कठोर निर्णय, राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य असे म्हणत शिवाजी महाराजांपश्चात सर्वांना सोबत घेऊन राज्यकारभार हाकण्याची हातोटी, त्यांचे राजकीय आणि आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.  एकाच वेळी पोर्तुगिज, सिद्दी आणि मुघलांशी धैयार्ने आणि शौयार्ने लढा देणारे संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. यासर्वांत अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे त्यांची काव्य प्रतिभा. संभाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वातील हे कलात्मक अंग स्मारकाच्या निमित्ताने समाजासमोर येणार आहे. संभाजी महाराजांनी अत्यंत कमी वयामध्ये राज्यनितीशास्त्रपर  ह्यबुधभूषणह्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये राज्यनिती, राज्य व्यवस्था, कर्तव्य, मंत्रीमंडळ आदी प्रकरणे आहेत. ग्रंथाच्या सुरुवातीलाच आजोबा शहाजी राजे व वडील छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आणि अलंकारीक अशी स्तुती आहे.=====छत्रपती संभाजी उद्यानामध्ये बारा फूट उंचीच्या चौथºयाचे काम सुरु आहे. या चौथऱ्याच्याभोवती बुधभूषण ग्रंथातील श्लोक असलेली शिल्पही उभारण्यात येणार आहेत. यासोबतच बुधभूषण ग्रंथाचे श्रवण करण्यासाठी ऑडिओ सिस्टीमसह हेडफोन्सचीही व्यवस्था केली जाणार आहे. ====संभाजी महाराजांचे शिल्प साकारताना हे शिल्प देखणे आणि प्रमाणबद्ध कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यांची देहयष्टी आणि बांधा मजबूत होता तो तसाच दाखविण्यात आला आहे. व्याघ्रचर्मावर बसून बुधभूषणचे लिखाण करताना समशेर हाताशी ठेवलेली आहे. त्यांचा पेहराव, अंगावरील आभुषणे, जिरेटोप याकडे बारकाईने लक्ष देण्यात आलेले आहे. ====बुधभूषण लिहितानाचेच शिल्प का साकारले?उद्यानापासून जवळच असलेल्या डेक्कनच्या गरवारे पुलावर छत्रपती संभाजी महाराजांचा हातामध्ये समशेर असलेला उभे शिल्प आहे. शौर्य, आवेश आणि धिरोदात्तपणाचा अनुभव या शिल्पामधून येतो. अगदी एक किलोमीटरच्या आत त्याच पद्धतीचे वीरश्रीयुक्त शिल्प उभारण्याऐवजी संभाजी राजांच्या व्यक्तीमत्वातला बौद्धिक, ज्ञानवंत पैलू व्यक्त करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड