शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रकार : पाण्याचे नमुने तपासून कारवाई करण्याची मागणी

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी खासगी टँकरच्या साह्याने रात्रीच्या वेळेस आजवर अनेक डोंगर भागात टाकले जात होते. मात्र आता हे पाणी ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे कुरकुंभ परिसरात आधीच थोड्याफार प्रमाणात राहिलेली शेती आता पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाºया कारखानदारांना शोधण्याचे आव्हान प्रदूषण मंडळ व तत्सम विभागापुढे उभे ठाकले आहे.

कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात अनेक छोटे उद्योग अस्तित्वात असून, यामधील अनेक उद्योगातून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी कंपनी मालक आजपर्यंत मनमानी पद्धतीने पाणी रात्रीच्या वेळेस कंपनीच्या खाजगी जागेत सोडत असल्याचे आजवर उघड झाले आहे. मात्र आता त्या जागाही पाणी सोडण्याच्या उपयोगासकमी पडत असून, ग्रामस्थांच्या जागरुकीने पाण्याची विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.त्यामुळे खासगीत टँकरला भाडेतत्त्वावर घेऊन हे पाणी दौंड-बारामती रस्त्याच्या दरम्यानअसणाºया वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. याबाबत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कुठलीच कारवाई आजतागायत करण्यात आली नाही.रासायनिक प्रकल्पातील अनेक कंपनी समूहाच्या माध्यमातून सांडपाणी सामूहिक प्रक्रियाकेंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या पाण्यावर ठरावीक मापदंडावरप्रक्रिया केली जाते मात्र ज्याकंपनीचे सांडपाणी अतिशय घातक आहे, त्यांना यामध्ये प्रवेशनाकारला जातो, त्यामुळे अशाकंपन्या बºयाच वेळा पाणीउघड्यावर सोडत असल्याच्यातक्रारी येत असतात. अनेक वेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्षात भेट देऊन वरील सर्व प्रकार पाहिलेला असून आर्थिक संबंध जपण्याच्या प्रचलित पद्धतीने कुठलीच कारवाई केली जात नाही. मात्र याचा प्रत्यक्ष त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे.महामार्गावर टँकर केला जातो रिकामा...कुरकुंभ येथून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, बारामती, नगरला जोडणारा मार्ग, तसेच दौंड तालुक्यातील अन्य औद्योगिक वसाहती, तसेच बारामती येथे असणारे उद्योग त्यामुळे परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी रस्त्यावर एखादा टँकर थांबला असला तरी त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अनेक वेळा बिघाड झाल्याच्या नावाखाली टँकर उभा करून गुपचूप सांडपाणी सोडले जाते. मात्र यावर लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ अशा मुजोरपणे प्रदूषण करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Puneपुणे