शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:03 IST

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सदोष जीएसटी प्रणालीमुळे महागाई वाढलेली आहे. कर्जमाफीचा शेतक-यांना फायदा झालेला नाही, अशी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून हमीभावाचे धोरण बदलले पाहिजे, निर्यातीसाठी सवलत दिली पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३२व्या गळीत हंगामचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन घोलप, सुमित्राताई शेरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवके वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ संजय काळे, जि़ प़ गटनेत्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी, सभासद, विविध गावांचे सरपंच, कारखान्याचे अधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते़पवार म्हणाले, की जीएसटी प्रणाली सदोष आहे. दुधावर जीएसटी नाही; परंतु दुधावर असलेल्या प्रॉडक्टवर जीएसटी लागू केल्याने दरवाढ झाली आहे. जीएसटीमुळे महागाई वाढत चालली आहे़ अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याने सर्वसामान्य शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. कारखान्यांना निर्यातीसाठी सवलती दिल्या पाहिजेत. निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, तरच शेतकरी टिकेल़ शेती व शेतकºयांची परस्थिती बदलली पाहिजे. यासाठी किंमत व धोरण बदलेले पाहिजे़ भविष्यात सामुदायिक शेती ही काळाची गरज आहे़विघ्नहर कारखाना उत्तमरीत्या सुरू आहे़ या वर्षी उसाचे टनेज वाढणार असल्याने गळिताची जबाबदारी विघ्नहरने घ्यावी़ यापुढेही काटकसरीने कारखाना चालवावा, असा सल्ला पवार यांनी या वेळी दिला़दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल़ मोदींनी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते पाळण्यात आलेले नाही़ शेतकºयांना कर्जमाफी नाही, हमीभाव नाही, कर्जमाफीसाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.पूर्वीचे सरकार असताना अडचणी होत्या़ आत्ताचे सरकार असूनही अडचणी आहेत़ आम्ही सत्तेत आहोत किंवा नाही हे माहीत नाही; परंतु हे सरकार शेतकºयांचे नाही़, अशी टीका अध्यक्षीय भाषणात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली. त्यांनी बैलगाडा शर्यती जिव्हाळ्याचा विषय असून त्याबाबत कायदा होऊनदेखील अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.शरद पवार हे रयतेचे राजे असून दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असे गौरवोद्गार आमदार शरद सोनवणे यांनी या वेळी काढले.चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी सूत्रसंचालन केले़ कारखान्याचे व्हा़ चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले़