शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा

By admin | Updated: February 28, 2017 06:43 IST

प्राचीन इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते, की मानवाच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केवळ विज्ञानामुळे झाल्याचे दिसून येते.

-डॉ. जे. के. सोळंकी प्राचीन इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते, की मानवाच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केवळ विज्ञानामुळे झाल्याचे दिसून येते. आणि निश्चितच विज्ञानामुळे मानवी समाजाची प्रगती झालेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठीच असावे, असे सर्वांना माहीत असूनही काही अविचारी लोक याचा दुरुपयोग करीत आहे. काही स्वार्थी व अविचारी लोकांच्या फायद्यासाठी समाजात अंधश्रद्धा आजही पसरविल्या जात आहेत व विज्ञान माहीत असूनही लोक आमिषाला बळी पडतात. यासाठी वरचेवर विज्ञान प्रसार केला पाहिजे व लोकांना विज्ञानवादी बनविले पाहिजे. वैज्ञानिकदृष्ट्या भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे व दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे पाश्चात्य जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. परंतु अजून खूप काही करायचे आहे. त्यासाठी भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती खूप वेगाने चालू ठेवली पाहिजे. भारत ही जगातील ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नक्कीच महासत्ता होईल; परंतु त्यासाठी देशातील प्रत्येकाने मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.मुळात मूलभूत विज्ञान हे विकासात्मक संशोधनाचा पाया असतो; परंतु मूलभूत विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी येण्यास तयार होत नाहीत, अर्थात याला काही प्रमाणात शैक्षणिक धोरणे व नोकरींची उपलब्धता हेही जबाबदार आहेत. मूलभूत विज्ञानाकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे जरी यामध्ये पैसा कमी मिळत असला तरीही...! शैक्षणिक धोरणे बदलाने, नोकरींची भरपूर प्रमाणात उपलब्धता करणे व चांगल्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून देणे हे प्रयत्न तर केलेच पाहिजेत. याचबरोबर खासगी कंपन्यांना व उद्योगांना यामध्ये समाविष्ट केले पाहिजे. (विज्ञान दिनामागचं गुपित!)(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)प्रसारमाध्यमामध्ये विज्ञान विषयाबद्दल लिहिण्यासाठी पत्रकारांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांना विज्ञानावर आधारित लेखासाठी चांगले मानधन देणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमे व विज्ञान संस्था यांच्यात वारंवार संपर्क व संवाद झाला पाहिजे. वरील बाबींचा पाठपुरावा केल्यास अभ्यासू पत्रकार प्रसारमाध्यमाच्या सदुपयोगातून विज्ञान प्रसार नक्कीच करतील, असा विश्वास आहे!जीएमआरटी प्रकल्प प्रमुख, खोडद (नारायणगाव)