शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहक तारा बदलण्यासाठी वीजपुरवठा होणार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:51 IST

सहकार्याचे आवाहन : लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

उरुळी कांचन : महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाच्यावतीने थेऊर उपकेंद्रातून वळती फिडरला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारा बदलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या वीजवाहक तारा बदलकामासाठी २२ केव्ही क्षमतेचा वळती फिडर वापरण्यात येणार आहे. दिवसभरात मर्यादित कालावधीसाठी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याकामी सहकार्य करावे, असे आवाहन उरुळी कांचन महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी केले.

थेऊर उपकेंद्रातून वळती फिडरला वीजपुरवठा करणारी वाहिनी ५० वर्षांपूर्वीची आहे. या वाहिनीवरील २२ केव्ही एसटी विद्युतवाहक तारा जीर्ण अवस्थेत आहेत. या वाहक तारांतून ३५० अँपियरपर्यंत प्रवाह कार्यरत आहेत. उन्हाळी हंगामात अतिदाब व पावसाळी हंगामात या तारांचा वीजजोड तुटून खंडितपणा या समस्या सातत्याने निर्माण होत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून उरुळी कांचन उपविभाग कार्यालयाकडून या संपूर्ण ६० किलोमीटर विस्तारलेल्या वाहिनीवरील तारा बदलण्याची कार्यवाही सुरू केली आहे. २० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कामासाठी वळती फिडर दिवसभर मर्यादित कालावधीसाठी बंद करण्यात येत आहे. महावितरणने आठवड्यातील गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसांत हे काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिवसभरासाठी सकाळी १० ते दु. ४ पर्यंत हे काम होणार असल्याने या कालावधीत वळती फिडर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या फिडरवरील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, तरडे, शिंदवणे, वळती या गावांत वरील वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.१ किलोमिटर तारा बदलण्याचे काम पूर्णउपविभागाने थेऊर उपकेंद्रातून साधारण १ किलोमीटर अंतरावरील तारा बदलण्याचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित कामासाठी होणारा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कार्यवाहीस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणे