शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाकणची वाहतूक कोंडी फुटणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 20:13 IST

चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला.

चाकण : पुणे- नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मोशी ते चांडोली या टप्प्यातील १७ किमी लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. चाकणच्या तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह चाकण येथे रस्त्याची पाहणी केली.

चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला होता.खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आहे.येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मोशी ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून,दुसऱ्या टप्प्यात नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याबाबत निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,चाकण शहराध्यक्ष राम गोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे,नगरसेवक विशाल नायकवाडी आदी उपस्थित होते.

टॅग्स :ChakanचाकणDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे