शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

चाकण टपाल कार्यालय रामभरोसे, सब पोस्टमास्टर पदही अनेक दिवसांपासून रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:26 IST

सुविधांचा आभाव, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे.

चाकण : मोबाइल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच सुविधांचा आभाव, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.कार्यालयात कुठलेही तातडीचे काम लवकर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पुरसे मनुष्यबळ भरून पोष्टाचा कारभार सुधारण्याची मागणी चाकण परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तर नागरिकांचे महत्वाचे टपाल वितरण न करता आठ दहा दिवस टपाल कार्यालयात पडून राहत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोस्ट आॅफिसला सब पोस्ट मास्तर नसल्याने कामाचा खोळंबा झाला आहे.औद्योगिक वसाहत, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्या वस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह, या भागातील सर्व बँका ,पतसंस्था यांचा कारभार तसेच दैनंदिन टपाल, ठेव योजना, बचत योजना, विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. नागरिकांना ताटकळत खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. कर्मचाºयांची कमतरता आहे त्यामुळे कामास विलंब होतो अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची खंत आहे. शहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहे; मात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत. चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आठ-दहा कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत. मोबाईलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी शासकीय पत्रे, कंपन्यांची टपाल , फोन, मोबाईलची बिले, विमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत. त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच शासनाच्या आणखी काही योजनांचा भार टपाल कार्यालयास दिल्यास येथील अपु?्या मनुष्यबळावर कर्मचा?्यांनी कसे काम करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.येथील एका महिला बचत गटाचे चेकबुक दहा सप्टेंबरला पोस्टात स्पीड पोस्टने येऊनही ते पोस्टात दहा दिवस पडून राहिले व संबंधित बचत गटाने बँकेकडून स्पीडपोस्ट क्रमांक घेऊन पाठपुरावा केल्यानंतर एकवीस तारखेला हातात मिळाले. हे उदाहरण अगदी ताजे असून ही येथील शोकांतिका आहे. येथील सब पोस्ट मास्तर डेप्युटेशनसाठी बाहेरगावी गेल्याने येथील महिला कर्मचाºयाला त्यांचे काम करावे लागत आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसChakanचाकण