शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला स्वतंत्र पाणी योजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:19 IST

१0 वर्षांत चाकणचे गावखेड्याचे रूप बदलून शहरीकरण झाले. ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली त्याला दीड वर्ष झाले. नगर परिषदेची सत्ता शिवसेनेने ताब्यात घेऊन आपला पहिला नगराध्यक्ष केला. नुकताच नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आले. राजकीय घडामोडी घडत आहेत; मात्र चाकणच्या मूलभूत समस्यांत काय बदल झाला? याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. चाकणकरांना सध्या दिवसाआड पाणी मिळत असून तहान भागत असली, तरी भविष्यातील वाढते नागरीकरण पाहता, चाकणला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.

- चंद्रकांत मांडेकर चाकण : नगर परिषद सध्या हजार लिटरला ८ रुपये देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विकतचे पाणी चाकणकरांना पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाण्यासाठी तशी ‘बोंब’ शहरात होत नाही. मात्र, २०११च्या जनगणनेनुसार चाकणची लोकसंख्या ४१ हजार ११३ अशी असली, तरी शहरात त्याच्या दुप्पट म्हणचे लाखाच्या आसपास लोक राहतात. हा नागरीकरणाचा वाढता वेग पाहता, भविष्यात पाणी ही मोठी समस्या चाकण नगर परिषदेसमोर असणार आहे. यासाठी शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.भामा-आसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात, तर भामा नदीतून जलशुद्धीकरण करून उर्वरित भागासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने अद्ययावतीकरण केल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शहराचे दोन विभाग करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत काळात चाकणचा पाणीप्रश्न हा गंभीर होता. मात्र, नगर परिषद झाल्यानंतर टंचाईच्या झळा कमी झाल्या. मात्र, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एमआयडीसी व तरंगती लोकसंख्या विचारात घेता सुमारे एक लाथ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५.५ टक्के इतक्या पाण्याची गरज लागेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण केले असून, सरकारच्या अमृत जलधारा या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.चाकण शहरासह सर्व लहानमोठ्या गृहप्रकल्पांना समाधानकारक पाणी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा मीटर सक्तीचे करणार आहे. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करणार आहे. अतिरिक्त पाणीगळतीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.असा होतो पाणीपुरवठा४चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १, २, ३, १३, १४, १५, १६, २०, २१ व २२ (आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर) या भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी विकत घेऊन पुरवठा करण्यात येतोे.४दुसºया दिवशी प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १७, १८, १९ व २४ (संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी, पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ) या परिसरासाठी भामा नदीवरील बंधाºयातील पाणी जॅकवेलमार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमधून पावडर, क्लोरिन गॅसचा योग्य प्रमाणात वापर करून फिल्टर करून पुरवठा करण्यात येत आहे.चाकण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास, स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे. त्यानुसार भामा-आसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या अमृत जलधारा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- मंगल गोरे, नगराध्यक्षाचाकण शहराच्या विकासासाठी निधीची मोठी गरज आहे. सध्या नव्याने जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे चाकणकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल.- राजेंद्र गोरे, उपनगराध्यक्ष