शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील; दिलीप कांबळे यांचे पुण्यात समता दिन कार्यक्रमात वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:45 IST

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देभुजबळ यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास : शरद पवारज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माली यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

पुणे : ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाले आहे. त्यामुळे आता ते लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ यांच्यासारखा लढवय्या नेता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे, मात्र लवकरच ते जेल बाहेर येतील,  असे संकेत समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात समता दिन कार्यक्रमात बोलताना दिले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेन्द्र कुशवाहा, परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदले, खासदार पंकज भुजबळ, राजस्थान येथील मोतीलाल सांकला, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माली यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी शरद पवार म्हणाले, की महात्मा फुले यांनी त्या काळी समाजाचा प्रचंड विरोध असताना, रुढी-परंपराचा पगडा असतानाच्या कालात आधुनिक व विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला. परदेशातील आधुनिक विज्ञानाचा वापर करुन कृषी, शिक्षण, स्त्री शिक्षण क्षेत्रात बदल घडविन्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांना अभिप्रेत असणारा हाच विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवल्यास राज्याची व देशाची प्रगती होईल. छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले, भुजबळ यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास झाला आहे. महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे, यासाठीही त्यांनीच मोठे काम केले. मी मुख्यमंत्री असताना फुले यांचे समग्र वाड:मय १५ भाषांमध्ये भाषांतरीत केले. त्यामुळे फुले यांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.    

                या कार्यक्रमात केंद्रीय मानव संसाधन मंत्री उपेंद्र कुशवाह यांनीदेखील भुजबळ यांचे कौतुक केले. त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे. सामाजिक चळवळीत काम करत नसते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आज न्यायपालिका, माध्यमे आणि खासगी क्षेत्रातील देखील ओबीसी व अन्यथा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा उपेंद्र कुशवाह यांनी येथे व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Kambleदिलीप कांबळेChagan Bhujbalछगन भुजबळ