लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सन २०१२ च्या दहा प्रभागातील सर्व्हेक्षणानुसार हॉकर्स झोनकरिता प्रभागातील पथारी व हातगाडी व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सन २०१२ व २०१४ या दोन्ही वर्षांत हॉकर्स झोनसाठी पात्र ठरलेल्या १३४१ व्यावसायिकांची बायोमॅट्रिक नोंदणीचे काम अखेरीस पूर्ण झाले असून, .व्यावसायिकांना प्रमाणपत्राचे वाटप क्षेत्रीय कार्यालयात सुरू आहे. भोसरीतील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मोशी, चऱ्होली, इंद्रायणीनगर, दिघी, चक्रपाणी वसाहत, सॅण्डविक कॉलनी, गवळीनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी, लांडेवाडी या दहा प्रभागातील हॉकर्स झोनसाठी पात्र ठरलेल्या व्यावसायिकांची बायोमॅट्रिक नोंदणीचे काम करून यामध्ये व्यवसाय करणाऱ्या हातगाडीचे व जागेचे छायाचित्र, तसेच पात्र अर्जदाराच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. काही व्यावसायिकांच्या जागा बदलल्या, किंवा स्थलांतर केल्याने ७८१ पात्र हॉकर्स झोन प्रमाणपत्र तयार होऊन वाटप करण्यात येत आहे.
हॉकर्स झोनसाठी प्रमाणपत्राचे वाटप झाले सुरू
By admin | Updated: May 13, 2017 04:41 IST