शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारलाच ‘प्लॅनिंग’चा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:33 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात दोन स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर (एसपीए) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात दोन स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर (एसपीए) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी एका समितीने पुण्यासह गुवाहाटीमध्ये ही संस्था सुरू करण्याची शिफारस केली. पण या संस्था सुरू करण्याचा विसर केंद्र सरकारलाच पडल्याचे दिसते. पुण्यामध्ये संस्थेची उभारणी करण्याबाबत अद्याप केंद्राकडून कसलाही पत्रव्यवहार करण्यात आला नसल्याचा दावा तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ‘एसपीए’बाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये दोन ‘एसपीए’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप संस्था उभारणीबाबत काहीच हालचाल सुरू नसल्याचे दिसते. अर्थसंकल्पामध्ये ठिकाणांची घोषणा करण्यातआलेली नसली तरी याबाबतच्या एका समितीने पुणे व गुवाहाटी या शहरांची यापूर्वीच शिफारस केलेली आहे. तसेच २०१३ व २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाशी पुण्यात हीसंस्था उभारण्याबाबत पत्रव्यवहारही केलेला आहे. पण अद्याप केंद्राकडून राज्य सरकारला याबाबत कोणतेही अधिक पत्र किंवा सूचना आलेल्या नाहीत.या विषयी नाव न छापण्याच्या अटीवर राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून एखाद्या संस्थेविषयी घोषणा केल्यानंतर त्याबाबतच्या सूचना किंवा पत्रव्यवहार संबंधित मंत्रालयाकडून राज्य शासनाशी केला जातो. त्यानंतर राज्य शासनाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाते.अर्थसंकल्पामध्ये ‘एसपीए’ची घोषणा केली असली तरी अद्याप पुण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार झालेला नाही.त्यामुळे जागा शोधणे किंवाइतर कोणतीही कार्यवाही सध्यासुरू नाही. केंद्र सरकारनेयाबाबत कळविल्यानंतरच काम सुरू होईल.>भाजपाची सत्ता असूनही पाठपुरावा होईनाआजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एसपीएबाबत केंद्राशी यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर असा पाठपुरावा झालेला नाही. नगर नियोजन क्षेत्रातील काही जण ही संस्था पुण्यात येण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. राज्य व केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. मनुष्यबळ विकासमंत्रीही पुण्याचे आहेत. शहराचे खासदारही भाजपाचेच आहेत.हे सगळे असतानाही पुण्यातही संस्था येण्यासाठी अन्य लोकांना पाठपुरावा करावा लागत आहे, अशी खंत तज्ज्ञांनी व्यक्त केली.