शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

केंद्रप्रमुखांकडून समूहसाधन केंद्रे उघडलीच जात नाहीत!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:04 IST

लाखो रुपये खर्च करून केंद्रप्रमुखांसाठी शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत समूहसाधन केंद्रांची निर्मिती केली. सुसज्ज, भव्य, देखण्या इमारती बांधून दिल्या आहेत. परंतु अनेक समूहसाधन केंद्रांच्या इमारती वर्षानुुवर्षे धूळ खात पडून आहेत. त्या इमारतीमधील केंद्रप्रमुखांची कार्यालये उघडण्यासदेखील त्यांना वेळ नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : लाखो रुपये खर्च करून केंद्रप्रमुखांसाठी शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत समूहसाधन केंद्रांची निर्मिती केली. सुसज्ज, भव्य, देखण्या इमारती बांधून दिल्या आहेत. परंतु अनेक समूहसाधन केंद्रांच्या इमारती वर्षानुुवर्षे धूळ खात पडून आहेत. त्या इमारतीमधील केंद्रप्रमुखांची कार्यालये उघडण्यासदेखील त्यांना वेळ नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पुरंदर तालुक्यात होत असलेल्या केंद्र भेट व इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमाच्या पार्श्वमूमीवर काही केंद्रप्रमुख व त्यांच्या कार्यालयांची गेल्या दोन वर्षांपासून माहिती घेतली असता या बाबी समोर आल्या आहेत.केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन तसेच येणाºया अडचणीसाठी ह्यशैक्षणिक गुणवत्ता मेळावेह्ण घेण्याचा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील व शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी हाती घेतला आहे. त्यानिमित्त पुरंदरमध्ये मंगळवारी(दि.८) शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला स्वत: उपाध्यक्ष व शिक्षणाधिकारी उपस्थित राहून शैक्षणिक गुणवत्तेबाबत मार्गदर्शन, अडीअडचणींसंदर्भात चर्चा करणार आहेत. सदर उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यातून शैक्षणिक क्षेत्राला फायदाच होणार आहे, परंतु पुरंदरच्या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांबरोबरच केंद्रप्रमुखांचे व अधिकाºयांचेच समुपदेशन होणे गरजेचे आहे. कारण सदरच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीचे मूल्यमापन केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारीच करणार आहेत.धालेवाडी, वाळूंज, पिसर्वे, राख, नाझरे सुपे, काळदरी, माहूर हे केंद्रप्रमुख केंद्रशाळेमध्ये शिक्षकांच्या बैठकाच घेत नाहीत किंवा गुणवत्तेसाठी मार्गदर्शन किंवा उपक्रमांसाठी कसलेही प्रयत्न करत नाहीत. सदर केंद्रप्रमुखांची कार्यालयेच अद्ययावत नसून कार्यालयात केंद्रातीलकोणत्याही शिक्षकांची व स्वत:ची कसलीच आधुनिक माहिती उपलब्ध होत नाही.केंद्रप्रमुखांना मिळणाºया शैक्षणिक खरेदी अनुदान निधीतून केंद्रासाठी आवश्यक अशी कोणत्या शैक्षणिक साहित्याची खरेदी केली? त्या शैक्षणिक साहित्याचा विनियोग व वापर केंद्रातील किती शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीसाठी झाला का? असे अनेक विषय तसेच केंद्रप्रमुखांची कर्तव्ये व त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाºया या विषयांची सविस्तर माहिती मेळाव्यामध्ये घेतली तर बरेच शैक्षणिक गुणवत्तेसाठीचे खºया अर्थाने कार्य होईल अशी चर्चा पुरंदमध्ये सुरु आहे. तशी वस्तुस्थिती आहे.एकाही केंद्रप्रमुखाचे कार्यालय आयएसओ नाहीचार वर्षांपूर्वी पुरंदर पंचायत समितीचे कार्यालयासह पुरंदमधील अनेक प्राथमिक शाळा आयएसओ झाल्या. संगणकीकृत व डिजिटल झाल्या. लोकसहभागासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून निधी उभा केला. त्यातूनच शालेय रंगरंगोटीबरोबरच शालेय भौतिक सुविधा निर्माण केल्या.खासगी शाळांनी स्पर्धेमध्ये उतरून राज्य शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक गुणवत्तावाढ व विकास’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक व पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक येथील शिक्षकांनी मिळवला. परंतु पुरंदरमधील एकाही केंद्रप्रमुखाला केंद्रप्रमुखांचे कार्यालय आयएसओ किंवा अत्याधुनिक डिजिटल का करावेसे वाटत नाही?केंद्रप्रमुख केंद्रात जाताच नाहीत. केंद्रातीलच मर्जीतील शिक्षकांना माहिती संकलित करून एकत्रितही करण्यास सांगतात. संगणकाचीही कामे संगणक हाताळता येणाºया शिक्षकांनाच सांगतात. स्वत: मात्र केंद्राकडे न फिरकता पंचायत समितीमध्ये किंवा तालुक्यात अन्यत्र वरिष्ठांसोबतच कायम फिरताना आढळतात. शिक्षकांना कार्यालयीन वेळेत कार्यालयास येण्यास नवनियुक्त अधिकारी व पदाधिकारी यांनी बंदी केली आहे. तशी बंदी केंद्रप्रमुखांनाही आवश्यक आहे.केंद्रप्रमुखांचेही मूल्यमापन व्हावे...सर्वच शिक्षकांच्या वर्षभराच्या शैक्षणिक कामाचीतपासणी होते. मूल्यमापन केले जाते. तसे केंद्रप्रमुखांचीही वार्षिक तपासणी व मूल्यमापन होणे गरजेचे आहे. परंतु केंद्रप्रमुखांची तसेच त्यांच्या केंद्रशाळेची तपासणीच केली जात नाही.१पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी व उपाध्यक्षांनीअसाच मेळावा सासवड येथे घेतला होता. त्या वेळी आपण तंत्रस्नेही केंद्रप्रमुख आहोत असे दाखवून अनेक केंद्रप्रमुखांनी केंद्रासाठी लॅपटॉप खरेदी केल्याचे मान्यवरांना दाखवले व त्यांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यातच केले होते. त्याचावापर किती जण करतात हे तपासणे गरजेचे आहे.२आयएसओ, डिजिटल शाळांप्रमाणे केंद्रशाळाही अद्ययावत होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम प्रत्येक केंद्रशाळेमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती मशीन बसवण्यासाठी प्रथमत: प्रशासनाने व मेळाव्याला मार्गदर्शन करणाºया मान्यवर अधिकारी पदाधिकारी यांनी तरतूद करावी, अशी चर्चा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.