दोन गटात वाद : सिनेस्टाईल हल्ल्याने थरारनागपूर : धरमपेठेतील लाहोरी बारमध्ये तरुणांच्या दोन गटात झालेल्या वादावादीनंतर गोळीबार करण्यात आला. एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी दगडफेकही केली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास लाहोरी बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये तरुणांचे दोन घोळके आजूबाजूच्या टेबलवर बसले होते. एका घोळक्यात एक तरुणीही होती. तिला दुसऱ्या गटातील आरोपी हातवारे, इशारे करीत असल्यामुळे वादाला सुरुवात झाली. ते पाहून बारमधील वेटर्सनी हातवारे करणाऱ्या गटातील तरुणांना हॉटेल बाहेर काढले. तरुणीपुढे अपमान झाल्याने या तरुणांनी आपल्या साथीदारांना फोन केला. रात्री ११.४५ च्या सुमारास स्कॉर्पिओ, स्कोडा आणि आॅल्टोमध्ये बसून १५ ते २० जणांचे टोळके आले. त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत बारच्या दिशेने माउझरमधून गोळ्या झाडणे सुरू केले. एकाने तलवार काढली तर काही गुंडांनी बारवर दगडफेक केली. वाहनांना दगड मारले. परिणामी दुसऱ्या गटातील तरुणांनीही माउझर काढले अन् दगडफेक केली. (प्रतिनिधी)-तर भयंकर घडले असतेतरुणीची छेड सुरू झाल्यानंतर एका गटाने लगेच १०० क्रमांकावर नियंत्रण कक्षास फोन करून माहिती दिल्याने या भागात रात्रपाळीवर असलेले दोन पोलीस (चार्ली) हॉटेलसमोर पोहचले. फायरिंग सुरू होताच त्यांनी आरडाओरड करून आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात माहिती देऊन ताफा मागवून घेतला.
प्राण्यांसाठी दफनभूमी
By admin | Updated: November 14, 2016 02:46 IST