शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धान्य घोटाळा चौकशीच्या फे-यात, समितीवर समिती नेमूनही अपहाराची जबाबदारी निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:06 IST

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची तपासणी करून जवळपास ५० लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला.

- विशाल शिर्के 

पुणे : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची तपासणी करून जवळपास ५० लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला.पुढे फेरतपासणीत या घोटळ्यातील रक्कम १० लाखांवर आली. त्यानंतरही गेल्या सात वर्षांत संबंधित अधिकाºयांवर दोषाची जबाबदारी निश्चित करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. केवळ चौकशी समित्यांच्या फेºयातच या घोटाळ्याची चौकशी अडकली असल्याची धक्कादायक वास्तव समोर आले आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ९ ते २४ डिसेंबर २०१० या कालावधीत धान्य गोदामाची तपासणी केली होती. त्यात गव्हाच्या ६ हजार ६२९ गोण्या, तांदूळ ५० आणि तूरडाळीच्या १० गोण्यांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. ही रक्कम तत्कालीन बाजारभावानुसार तब्बल ४४ लाख ४३ हजार रुपये इतकी होती. इतक्या रकमेचा धान्यसाठा कमी आढळल्याचा अभिप्राय या तपासणी पथकाने नोंदविला होता.आवक-जावक नोंदी, माल ठेवण्याची पद्धत यावरदेखील गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे तत्कालीन सचिव उमाकांत दांगट यांनी शहर अन्नधान्य अधिकाºयांना त्या वेळी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली होती.माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही घटना समोर आणली आहे. त्यानंतर पुढे या प्रकरणाची १० ते १९ मार्च २०११ दरम्यान फेरतपासणी करण्यातआली. यात पहिल्या तपासणीच्या तुलनेत केवळ १ हजार ४७७ क्विंटल गव्हाचा अपहार झाल्याचे आढळून आले. त्याची रक्कम ९ लाख ८९ हजार रुपयांच्या घरात होती. नंतर या प्रकरणाची चौकशी डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ पर्यंत ठप्प होती.पुढे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दबाव वाढल्याने पुन्हा तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापही या समितीचे कामकाज पूर्ण झाले नाही. गंमत म्हणजे या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावणारे सनदी अधिकारी दांगट, विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झालेआहेत. मात्र, अजूनही या घोटाळ्याच्या चौकशी समितीचा घोळ संपलेला नाही.समितीचा असा खेळखंडोबाडिसेंबर २०१०मध्ये उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन लेखाधिकारी एस. एन. पाटील, एन. एम. काकडे, बी. व्ही. कांबळे यांची २८ डिसेंबर २०१२ रोजी समिती स्थापन केली. पुढे २०१७मध्ये राजेंद्र येराम, एम. जी. वाघमारे, मंगेश खरात यांची नियुक्ती झाली.आता पुन्हा येराम यांच्या जागी एम. यू. चराटे यांची १८ मे २०१७ रोजी नियुक्ती करण्यात आली. मात्र, चराटे यांनी या समितीच्या कामकाजात सहभागच घेतला नाही. त्यासाठी त्यांना २८ जुलै २०१७ रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. या चौकशी समितीचे कामकाज पूर्ण करण्याबाबत सरकारकडून विचारणा होत आहे.या तपासणीसाठी आपल्याला कागदपत्रांच्या छायांकित प्रती दिल्यानंतरही आपण कामकाज केलेलेनाही, अशी नोटीस बजावण्यात आली होती. शासनाकडून आक्षेप आल्यास त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाईल, असेही नोटीशीत बजावण्यात आले होती.२०१३ ते २०१७या काळात या प्रकरणी नक्की काय कामकाज झाले, याची माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे घोटाळ्याच्या चौकशीचा फेरा सात वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समितीची सद्य:स्थिती माहीत नसल्याची प्रतिक्रिया अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवारयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या सात वर्षांत धान्य घोटाळ्याची समिती नेमून, तपासणी करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. या प्रकरणात तत्कालीन बडे अधिकारी अडकलेले असल्यानेच, तपासाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या समितीतीतील सदस्यांची पदे पाहिल्यास, वरिष्ठ अधिकाºयांविरोधात ते कारवाईचा अहवाल कसा देणार, हादेखील एक प्रश्नच आहे. - जयप्रकाश उणेचा, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Puneपुणे