शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीत अपघात झाल्यास ‘नो क्लेम’, बीआरटी मार्गामध्ये लावला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:26 IST

सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरीदेखील बिनदिक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॉर्डन नियुक्त केले असताना त्यांना न जुमानता खासगी वाहनचालक या मार्गाचा वापर करीत आहेत.

हडपसर -  सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरीदेखील बिनदिक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॉर्डन नियुक्त केले असताना त्यांना न जुमानता खासगी वाहनचालक या मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे या मार्गात अपघात झाल्यास संबंधितांना विमा कंपनीकडून क्लेम मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण पीएमपी प्रशासनाने दिले आहे. तशा प्रकारचा फलक बीआरटी मार्गावर लावण्यात आला आहे.खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे बीरआटी मार्गात वाहतूककोंडी व अपघात होत आहेत. त्यावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बीआरटी मार्गात वाहनांचा अपघात झाल्यास विम्यासाठी क्लेम करता येणार नाही, असा फलक प्रशासनाच्या वतीने लावण्यात आला आहे. तरीदेखील अनेक खासगी वाहने या मार्गातून धावतात.खासगी वाहनांसाठी असलेली लेन कमी पडत असल्यामुळे नागरिक बीआरटी मार्गातून जातात. नाईलाजास्तव वाहनचालक वाहने बीआरटी मार्गातून घालतात. त्यामुळे प्रशासनाने खासगी वाहनांसाठी असलेली लेनची रुंदी वाढवावी. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सदोष बीआरटीची अंमलबजावणी होत असल्यानेच या मार्गावर अपघात वाढले आहेत, असे नागरिक संतोष जगताप यांनीसांगितले.बीआरटी मार्गातघुसखोरी नकोसोलापूर रस्ता रुंदीने मोठा असला तरी अनेक वाहनचालक घाई करून बीआरटी मार्गातून वाहने घालतात. या मार्गात अनेकदा अपघात झाले आहेत. कारण हा मार्ग छोटा असून, त्यातून केवळ पीएमपी बस जाऊ शकते. परंतु, वाहनचालकाचे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो या मार्गातून खासगी वाहनचालकांनी जाऊ नये, यासाठी बीआरटी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. तसेच ठिकठिकाणी वॉर्डनही उभे करण्यात आले होते. तरीदेखील वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात.बीआरटीत अपघात होऊन वाहनांचे नुकसान झाल्यास विम्याचा क्लेम मिळत नाही. लाईफ इन्शुरन्सचा क्लेम मिळणे अथवा नाकारणे हे प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार ठरते. तसेच पीएमपी बसकरिता हा रस्ता राखीव असल्याने पीएमपीएलवर वाहनचालकांना क्लेम करता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनचालकांनी बीआरटी मागार्तून वाहने चालवू नयेत.- प्रमोद तोरडमल, विमा प्रतिनिधी

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या