शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 14:24 IST

व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ 

ठळक मुद्देनोटबंदी एक आर्थिक भुकंप : माणिकराव ठाकरे बाळासाहेब ठाकरे कलादालनात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : देशाला मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटबंदी एक आर्थिक भुकंप आहे़ या नोटबंदीमुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांने घट झाली़ विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले़ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड़ अभय छाजेड यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित केलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ ठाकरे म्हणाले, समाजाच्या संवेदना व आक्रोश पोहचविण्यासाठी व्यंगचित्र अत्यंत प्रभावी माध्यम आहे़ नोटबंदीच्या काळामध्ये अनेक नागरिक मृत्यमुखी पडले़ बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या़ देशात १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत़ शेतकरी- शेतमजूर हवालदिल झाला आहे़ लघुउद्योग व मध्यम उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ असंघटीत क्षेत्रामध्ये लाखो लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत़ मोदी सरकारच्या नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ ८ नोव्हेंबरला काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी काळा दिवस पाळला जाणार आहे़ जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे़ यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ़ विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख, श्रीकांत शिरोळे, रशिद खान, संजय बालगुडे, रोहित टिळक, रशिद शेख, सदानंद शेट्टी, डॉ़ सतिश देसाई, शिवाजी केदारी, रमेश अय्यर, शानी नौशाद, मुकारी अलगुडे, हाजी नदाफ, महिला काँग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, लता राजगुरु, सुजाता शेट्टी, नुरुद्दीन सोमजी, दीपक रामनानी, जयकुमार ठोंबरे, राहुल तायडे, राजेंद्र पेशने, देविदास मगर आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणे