शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत बोगद्यात कारची बसला धडक; ३ ठार, २ जखमी

By admin | Updated: May 7, 2017 17:15 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार समोर जाणार्‍या बसला मागून जोरात धडकून भीषण अपघात झाला

ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 7 - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार समोर जाणार्‍या बसला मागून जोरात धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी निता व्होल्वो बस ही कामशेत बोगद्यातून मुंबईकडे जाताना अचानक गाडीच्या मागील बाजूने धूर येऊन ऑइल गळू लागले, त्यावेळी बोगद्यातील लाईट गेली आणि मागून भरधाव वेगात आलेली कारही बसला मागून धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये कार चालकासह दोन जण व एक महिला मृत्युमुखी पडली, तर एका लहान मुलासह दोन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक आणि आयआरबीच्या पथकाने अपघातग्रस्त कारमधून मृत आणि जखमी यांना बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत ऑइल गळाल्याल्या ठिकाणी माती टाकत दोन लेनवरून वाहतूक सुरू केली.