शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सावधान ! पुणे आरटीओच्या फेक बेवसाईटवरुन होतेय फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 08:10 IST

आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल दंड केला आहे का, ते तपासून पहा असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर जाऊन वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यात फेक वेबसाईटवर ते जातात. त्यातून त्यांची फसवणूक होत असून सायबर पोलिसांकडे आतापर्यंत गेल्या २ दिवसात ५ तक्रारी आल्या आहेत.

विवेक भुसेपुणे : आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल दंड केला आहे का, ते तपासून पहा असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर जाऊन वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यात फेक वेबसाईटवर ते जातात. त्यातून त्यांची फसवणूक होत असून सायबर पोलिसांकडे आतापर्यंत गेल्या २ दिवसात ५ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.हेल्मेटसक्तीला पुण्यात विरोध झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्हीद्वारे हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सध्या शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करुन त्यांना कारवाई केल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जातो. त्याचबरोबर आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाचा दंड न नाही ना हे तपासावून पाहण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर आरटीओ पुणे असा सर्च मारतात. त्यावेळी काही जणांवर नकळत फेक वेबसाईटवर जातात. त्यातून त्यांना तुमच्या वाहनावर मोठा दंड असल्याचे सांगून तो भरायला सांगतात. त्यांनी तो भरल्यानंतर आरटीओकडून दंड भरल्याची पावती येते. ती या वेबसाईटवरुन येत नाही. लोकांनी संबंधित फोनवर नंतर संपर्क साधल्यावर तो बंद आढळून येतो.आतापर्यंत दोन दिवसात ५ तक्रारी प्रत्यक्षात आल्या असल्या तरी अजून काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या गुन्ह्यांचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.काय काळजी घ्याल?* आरटी ओ पुणे च्या वेबसाईटवर ०२०- २६०५८२८२/ ०२० - २६०५८०८०/ ०२०- २६०५८५५५ हे फोन नंबर असतील तरच पुढे संपर्क करा. ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे.* ज्या वेबसाईटवर ९१ ने सुरु होणारे नंबर असतील, त्या वेबसाईटवर संपर्क साधू नका.* हे फोन परराज्यातील आहेत. त्यामुळे त्यावरुन फसवणूक होऊ शकते. आतापर्यंत हा क्रमांक असलेल्या वेबसाईटवर संपर्क करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. आरटीओ पुणे च्या नावाने ऑनलाईन दंड भरल्यानंतर तो फेक अकाऊंटला जमा झाला असल्याने वाहनचालकांची फसवणूक झाल्याच्या ५ तक्रारी गेल्या दोन दिवसात आल्या आहेत. तेव्हा लोकांना आरटीओ पुणेच्या अधिकृृत वेबसाईटला भेट देऊन अगोदर खात्री करावी.- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस, पुणे

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसcyber crimeसायबर क्राइमpune rtoपुणे आरटीओ