शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला नेले फरफटत; खडकीतील घटना

By विवेक भुसे | Updated: March 25, 2023 20:50 IST

खडकीतील रेल्वे भुयारी मार्गातून भरधाव जाणाऱ्या मुजोर कारचालकाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार

पुणे :

खडकीतील रेल्वे भुयारी मार्गातून भरधाव जाणाऱ्या मुजोर कारचालकाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत वाहतूक पोलीस जखमी झाला असून खडकी पोलिसांनी कारचालक तरुणाला अटक केली आहे.

याबाबत वाहतूक पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी राबाडे (वय ३३) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राबाडे यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी कारचालक सूरज भारत जाधव (वय २९, रा. मामुर्डी, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. सूरज याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, दुखापत करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकी पोलीस ठाण्याच्या समोरील चर्च चौकात शुक्रवारी दुपारी पाऊण वाजता घडली.

पोलीस शिपाई गणेश राबाडे खडकी वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. राबाडे आणि त्यांचे सहकारी विजय आढारी खडकीतील रेल्वे भुयारी मार्ग परिसरात वाहतूक नियमन करत होते. खडकीतील मेट्रोच्या कामामुळे या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. कारचालक सूरज जाधव वेगाने लेन कट करुन निघाला होता. पोलीस कर्मचारी राबाडे आणि आढारी यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जाधवने कार दोघांच्या अंगावर घातली. प्रसंगावधान राखून राबाडे कारच्या बोनेटवर चढले. त्यानंतरही जाधवने कार तशीच पुढे नेली. पोलीस कर्मचारी राबाडे यांना काही अंतर फरफटत नेले. राबाडे यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथून निघालेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. नागरिकांनी जाधव याला अडवले. कारचा अचानक ब्रेक दाबल्याने राबाडे बोनेटवरुन खाली पडले. त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली.

कारचालक जाधवला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करत आहेत.