शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दरडोई एक गाडी, तर दीड झाड

By admin | Updated: June 5, 2016 04:07 IST

देशातील वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, शहरातील झाडांनीही ३८ लाखांचा आकडा ओलांडला असून शहरातील २०११च्या

- सुनील राऊत, पुणे

पुणे : देशातील वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, शहरातील झाडांनीही ३८ लाखांचा आकडा ओलांडला असून शहरातील २०११च्या जनगणनेची आकडेवारी पाहता, शहरात माणशी एक गाडी, तर दीड झाड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका बाजूला शहरातील वाहनांमुळे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र शहरात असलेल्या वृक्षसंपदेमुळे शहरातील प्रदूषण अद्याप तरी धोक्याच्या पातळीवर गेले नसल्याने पुणेकरांंसाठी ती समाधानाची बाब समजली जात आहे.केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रलयाच्या भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था व पुणे महापालिका यांच्या सहभागातून ‘सफर पुणे’ उपक्रमांतर्गत पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणांतील प्रमुख घटकांचे हवेतील २४ तासांचे प्रमाण मोजण्याची चाचणी यंत्रे बसवलेली असून, त्यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.गेल्या दशकभरात शहराचा विस्तार झपाट्याने झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ५४० मीटर उंचीवर असून, शहराचे एकूण क्षेत्रफळ २५०.५६ चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे. तर, शासनाच्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार निश्चित करण्यात आलेली आहे. रोजगार तसेच इतर सोयीसुविधांमुळे पुणे शहर गेल्या दशकभरात वेगाने वाढलेले आहे. २००१च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या २५ लाख निश्चित करण्यात आली होती. या वेळी शहरातील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या ही अवघी १० लाख होती. म्हणजेच लोकसंख्या ५ लाखांनी वाढली असली, तरी वाहनांची संख्या मात्र ३ पटींनी वाढली आहे. शहरात दरडोई १ गाडी असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ३ ते ४ वर्षांपूर्वी शहरात वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मात्र, याच वेळी शहरात वाढत असलेली वृक्षांची संख्या पर्यावरणाला दिलासा देणारी ठरली असून, शहरात दरडोई एक गाडी असली, तरी प्रतिव्यक्ती १.२३ टक्के झाड आहे.एका व्यक्तीमागे दीड झाड शहराचे एकूण क्षेत्रफळ २५ हजार ५६ हेक़्टर असून त्या क्षेत्रफळात सुमारे ३८ लाख ६० हजार ५५ वृक्ष आहेत. या झाडांची घनता प्रतिहेक्टर १५४ वृक्ष आहे. तर, प्रतिएकर हे प्रमाण सरासरी ६२ वृक्ष असून माणशी ते १.२३ वृक्ष आहे. शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच टेकड्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे वृक्षांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीवर असलेले कडक निर्बंध तसेच वृक्षारोपणाच्या पद्धतीत झालेला बदल आणि पर्यावरणाविषयी होणारी जनजागृती यांमुळे वृक्षांचे प्रमाण वाढण्यास मदत होत असल्याचे चित्र असून ते पर्यावरणसंवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावीत आहे.31 लाखपुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे38 लाखपुणे शहरातील झाडांच्या संख्येनेही ३८ लाखांचा आकडा ओलांडला आहेसमुद्रसपाटीपासून540 मीटरउंचीवर असून शहराचे एकूण क्षेत्रफळ250.56 चौरसकि.मी. विस्तारलेले 31 लाख 24 हजारशहराची लोकसंख्याअतिसूक्ष्म धूलिकणांचा वाढला आहे धोकाअतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाचे असतात. हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकाळापर्यंत साठून राहतात.हे सूक्ष्मकण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तात मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक कण असतात. हे कण वातावरणातील प्रदूषण वाढवतात.टू स्ट्रोक वाहनांमुळे तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शहरामध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.प्रदूषण नियंत्रण कायद्याप्रमाणे प्रदूषकांचे प्रमाण सभोवतालच्या हवेत जास्तीत जास्त किती असावे, हे निर्देशित केलेले आहे. सामान्यपणे वायुप्रदूषणाला कारणीभूत असणारे काही घटक व त्या घटकांची मानांकने निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार शहरातील हवेची स्थिती पुढीलप्रमाणे : प्रदूषकेऔद्योगिक, रहिवारी व इतर जागाशहराची सद्य:स्थितीकारण (सर्व परिमाने मायक्रो ग्रँम/घनमिटर)(सरासरी) सल्फर डायआॅक्साईड ५०३०वाहनांचा धूर, पेट्रोलियम इंधनवापरनायट्रोजन डायआॅक्साईड४०५०वाहनांमधून बाहेर पडणारा धूर सूक्ष्म धूलिकण (पीएम १०)६०७०वाहनांमुळे उडणारी धूळ सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५)४०५०वाहनांमुळे उडणारी धूळ कार्बन मोनॉक्साईड (प्रति क्यू,मीटर)२.५१अपूर्ण ज्वलन, वीटभटटया