शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरचे जेवण मिळण्याचा एकबोटेंचा अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:36 IST

कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी घरचे

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी घरचे जेवण मिळण्याबाबत न्यायालयात दाखल केलेला अर्ज विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळून लावला.एकबोटे यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची १४ दिवसांसाठी न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला योग्य तो औषोधोपचार देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, एकबोटे यांच्या वतीने सुरक्षा आणि घरगुती जेवण मिळण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.कारागृह अधिकारी, फिर्यादी आणि तपास अधिकारी यांनी या अजार्ला विरोध केला. कारागृह प्रशासनाकडून बंदीवानांना चांगला आहार दिला जात असल्याचे सांगताना एकबोटेंचा घरचे जेवण देण्यासंदर्भातील अर्ज मान्य केल्यास इतर कैद्यांमध्ये योग्य संदेश जाणार नाही,असे म्हणणे कारागृह अधिकाऱ्यांनी मांडले. एकबोटेंना यापूर्वीच योग्य ती सुरक्षा पुरविण्यात आली असल्याचे सांगत एकबोटेंचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.