शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी सुट्या पुन्हा एकदा रद्द, कर्मचारी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:33 IST

शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

पुणे : शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.राज्य सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटून गेला; मात्र अद्यापही दुसरी यादी जाहीर झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील यादीमध्येही मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याने सर्व शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाहीत.आयटी विभागाच्या चुकांमुळे कर्जमाफीला वेळ लागत असल्याचे चित्र आहे. पहिल्या यादीतील त्रुटी दूर करून ही निर्दोष यादी शासनाला पाठविण्यात आली आहे.दुसºया हिरव्या यादीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामध्ये उद्भवणाºया अडचणी दूर करण्यात येत आहेत. शेतकºयांकडून कर्जमाफीला लागत असलेल्या विलंबामुळे टीका होऊ लागली आहे. त्यामुळे सहकार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची धावपळ सुरू आहे.या याद्यांच्या कामासाठी हातात वेळ कमी राहिला असून अधिवेशनापूर्वी दुसरी यादी जाहीर करून त्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. त्यामुळे सहकार विभागावर कामाचा प्रचंड त्राण आहे. सध्या सहकार विभागातील उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कर्जमाफीच्या कामामध्ये गुंतले आहेत.चार महिन्यांपासून या विभागातील अधिकारी हे कर्जमाफीच्या कामाला जुंपलेले आहेत. यापूर्वीही त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी सुट्या रद्द करण्याचा आदेश दिल्याने आणखीनच अस्वस्थता वाढली आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलादची जाहीर झालेली शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे.रविवारीही कर्जमाफी योजनेचे काम करणाºया सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना कामावर येण्याचे आदेश झाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्या उपभोगता येणार नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी