शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

संरक्षणविनाच कालवे, ठिकठिकाणी पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 03:49 IST

बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे.

- युगंधर ताजणेपुणे - बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे. या दुर्लक्षाचा परिणाम गुरुवारी दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहायला मिळाले. शहरातून वाहणाऱ्या कालव्याला मजबूत भिंत बांधली जावी, अशी अपेक्षा ठिकठिकाणच्या रहिवाशांनी व्यक्त केली.गुरुवारी दांडेकर पुलाजवळ घडलेल्या जलतांडवामुळे शुक्रवारी ‘लोकमत’ने शहरातील विविध भागांत असणाºया कालव्याच्या भिंतीची पाहणी केली. त्यावरून प्रशासनाने तातडीने कालव्याच्या भिंतीची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे दिसून आले. या वेळी सिंहगड रस्ता, वडगाव धायरी, स्वारगेट, पुलगेट, लष्कर व हडपसर भागातील अनेक कालव्यांच्या भिंतीची पूर्णपणे पडझड झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून, भविष्यात मोठा अपघात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारच्या घटनेनंतर धरण भागातून पाणी बंद केल्यानंतर कालव्यांमधील निकृष्ट बांधकामाची वस्तुस्थिती समोर आली आहे. नांदेड फाटा कालव्याची भिंत पूर्णपणे खचली असून भिंतीवरील सिमेंटचे प्लॅस्टर निघून गेले आहे. ठिकठिकाणी दगड पडले असून सर्वत्र माती पसरली आहे. भिंतींना मोठी भगदाडे पडली आहेत. सिंहगड रस्त्यावरील लगडमळा येथील कालव्याच्या भिंतीची परिस्थिती गंभीर आहे. सावित्रीबाई फुले वसाहतीतील नागरिकांच्या जिवाला भविष्यात धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी अवस्था तेथील नाल्यांची आहे. या नाल्यांमध्ये कालव्यातील पाणी येत असल्याने तेथील भिंतीचा भराव खचला आहे. शंकरशेठ रस्ता येथील गोळीबार मैदानाजवळ पाटबंधारे खात्याचे कार्यालय असतानादेखील कालव्याच्या भिंतीची पडझड झाली आहे. अनेक जागी संरक्षक कठडे नाहीत. भिंतीना प्लॅस्टर नसणे, जागोजागी साठलेला कचरा, भिंतीवर दगड व मातीचे ढीग दिसतात.आम्हालाहीआता भीती वाटतेदांडेकर पुलाजवळील वस्तीमध्ये जी घटना घडली तशी आमच्या भागात होईल की काय, याची भीती वाटू लागली आहे. आमच्या इथून जो नाला वाहतो त्यात कालव्याचे पाणी येते. पाणी थोपविण्यासाठी भिंत बांधण्यात आली होती; मात्र दोन वर्षांपूर्वी सतत पाण्याच्या प्रवाहाने ती भिंत खचली आणि पडली. यामुळे वस्तीतील सहा घरांमध्ये पाणी शिरले. त्यांनी पुढे स्थलांतर केले. दर वेळी पालिकेच्या कर्मचाºयांकडे तक्रार करायची आणि त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे, हा नेहमीचा अनुभव आहे. गुरुवारी दांडेकर पुलाजवळच्या वस्तीमध्ये ज्या पद्धतीने दुर्घटना घडली ती जर आमच्या वसाहतीमध्ये घडली तर त्याला जबाबदार कोण? वेळेवर दुरुस्तीची कामे केल्यास अपघाताचा धोका कमी होईल.- दीपा आखाडे व सुनीता कांबळे (सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता)पाहणी केलेले कालवेनांदेड फाटा कालवासिंहगड रस्ता, लगडमळाआंबेडकरनगर, सिंहगड रस्तासावित्रीबाई फुले वसाहत,सिंहगड रस्ताडायस प्लॉटशंकरशेठ रस्ता, गोळीबार मैदान येथील कालवापुलगेट येथील कालवाभैरोबा नालागारमाळ येथील आंबेडकरनगर या भागात साधारण ३00 ते ४०० कुटुंबे राहतात. ही कुटुंबे कालव्याच्या कडेलाच आहेत. दोन वर्षांपूर्वी या भागात कालव्याची भिंत खचून अपघात झाला होता. त्या वेळी पाण्याचा मोठा लोंढा घराच्या बाजूने आला. विशेष म्हणजे, पाटबंधारे खात्याकडे तक्रार करून, लेखी निवेदने देऊनदेखील त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. कालव्याच्या भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. आम्हा नागरिकांच्या जिवाचा धोका टळलेला आहे, असे वाटत नाही. संकट कधीही येऊ शकते. प्रत्यक्षात कालव्यांची स्थिती दयनीय आहे.- रमेश सूर्यवंशी, गवंडी, गारमाळमहापालिकेच्या पाणीवाटप लाईनचे काम चालू आहे, असे कारण सांगून धायरी गाव येथील कालव्याजवळ अनेकदा पाण्याची गळती सुरू असते. पालिकेचे कर्मचारी येतात, पाहणी करून निघून जातात; परंतु कालव्यावरील पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पुलांबरोबर भिंतीची डागडुजी गरजेची असून विसर्जनाच्या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी गर्दी होते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या भिंतीमधील भराव खचतो आहे.- लक्ष्मीकांत धनवडे, धायरीगावउंदीर, घुशी, खेकड्यांवर जबाबदारी ढकलणाºयांनो ही पाहा वस्तुस्थितीकालव्यांमधील भिंतींना छिद्रे व त्या खचण्यामागे उंदीर व घुशी आणि खेकड्यांचे कारण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यांच्या या अजब तर्काला काय म्हणावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.कित्येक वर्षांपासून लांबलेली दुरुस्ती, निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे कालव्याच्या भिंतींना मोठी भगदाडे पडली आहेत. त्यात कालव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या