शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:29 IST

साधारण 1950-60 च्या दशकात अमेरीकेत स्टॅण्डअप काॅमेडी शाेजला सुरुवात झाली हाेती. हे कल्चर अाता हळूहळू भारतात त्यातही पुण्यातही रुजत असून अनेक स्टॅण्डअप काॅमेडी शाेजचे पुण्यात अायाेजन करण्यात येत अाहे.

ठळक मुद्देस्टॅण्डअप काॅमेडीला वाढताेय तरुणांचा प्रतिसादपुण्यात अायाेजित करण्यात येत अाहेत शाेज

पुणे : तुम्ही एखाद्या कॅफे मध्ये गेला अाहात अाणि तेथे तुम्हाला तुमची कला सादर करण्याची संधी मिळाली तर ? किंवा तुम्ही ज्या कॅफेमध्ये गेला अाहात तेथे काेणीतरी स्टॅण्डअप काॅमेडी करत असेल तर....तुम्ही म्हणाल असं फक्त बाहेरील देशांमध्येच हाेत असतं. मात्र अाता अाेपन माईक, स्टॅण्डअप काॅमेडीसारखे शाेज भारतात अाणि तेही पुण्यात देखील हाेत असून तरुणांचा भरभरुन प्रतिसाद याला मिळत अाहे. या शाेजच्या माध्यमातून तरुणाईसाठी मनाेरंजनाचं एक नवं माध्यम समाेर अालं अाहे.     साधारण 2016 पासून पुण्यात गटागटाने स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करण्यास सुरुवात झाली. त्याचबराेबर अनेक ठिकाणी अाेपन माईक चे कार्यक्रम अायाेजित करण्यात येऊ लागले. अाेपन माईकमध्ये तुम्हाला जी कुठली कला येते ती सादर करण्याची मुभा असते. या शाेजमुळे तरुणांना अापल्या हक्काचं एक व्यासपीठ मिळालं अाहे. अाधी इंग्रजीमध्ये हे शाेज केले जात हाेते. त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अाता मात्र हळूहळू तरुणांचा अाेढा या शाेजकडे वाढ असून महिन्यातून दाेन तीन शाेज पुण्यामध्ये अायाेजित केले जात अाहेत. या शाेजची सुरुवात भारतात मुंबईतून झाली. मुंबईत काॅस्माेपाॅलिटीयन कल्चर असल्यामुळे तेथे या शाेजला माेठ्याप्रमाणावर रिस्पाॅन्स मिळत अाहे. पुण्यात हे कल्चर रुजायला थाेडासा वेळ लागताेय. मुंबईत खास स्टॅण्डअप काॅमेडीसाठी अनेक क्लब असून तेथे रेग्युलर अनेक शाेज हाेत असतात. पुण्यात विविध कॅफे, बार, स्टुडिअाेजमध्ये हे शाेज केले जात अाहेत.     पुण्यातील माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे देशातील विविध भागांमधून अालेल्या नागरिकांची संख्याही माेठी अाहे. शहरातील काेरेगावपार्क, विमाननगर, कल्याणीनगर, बाणेर, हिंजवडी या भागात या नागरिकांची संख्या अधिक अाहे. पुण्यात सुरुवातील इंग्रजी भाषेत या स्टॅण्डअप काॅमेडी शाेजची सुरुवात झाली. अाधी फारसा रिस्पाॅन्स मिळाला नाही. त्यानंतर इंग्रजी काॅमेडीमध्ये हिंदीचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रेक्षकांची संख्या वाढली. याच्या पुढे जात पुण्यातील सारंग साठे या तरुणाने व त्याच्या सहकाऱ्यांनी थेट मराठीतच स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज सुरु केले. या शाेजला अाता तरुणांचा माेठा प्रतिसाद मिळत असून अापल्या भाषेतील विनाेद एेकायला मिळत असल्याने त्यांना जास्त भावत अाहेत.     गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करत असलेला अाेंकार रेगे म्हणाला, सुरुवतीच्या काळात अाम्ही सहा जणांनी स्टॅण्डअप काॅमेडी करण्यास सुरुवात केली हाेती. अाज 150 तरुण अामच्यासाेबत सहभागी झाले अाहेत. त्यातील 80-90 जण हे नियमित स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करत आहेत. पुण्यात या शाेजसाठी मुंबईसारख्या विशिष्ट जागा नसल्याने विविध कॅफेज, बार अाणि इतर ठिकाणी हे शाेज अायाेजित केले जात अाहेत. तरुणांचा या शाेजला माेठा प्रतिसाद मिळत अाहे. यानिमित्ताने पुण्यात एक नवीन कल्चर रुजू हाेऊ पाहत अाहेत.     या स्टॅण्डअप काॅमेडी शाेजची सुरुवात 1950-60 च्या दशकात अमेरिकेत झाली. त्यावेळी तेथेही लाेकांनी त्याला माेठा प्रतिसाद दिला. मात्र कालांतराने तेथील राजकारण, व इतर धार्मिक विषयांवरही उपराेधिक विनाेद केले जाऊ लागल्याने अनेक काॅमेडीयनांची मुस्काटदाबी करण्यात अाली. या शाेजला कुठलिही सेन्साॅरशिप नसल्यामुळे सध्या खुलेपणाने सादरिकरण केले जात अाहे. मात्र येत्या काळात या शाेजवरही बंधने येण्याची शक्यता काॅमेडीयन वर्तवत अाहेत. 

 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक