पौड : मुळशी धरण परिसरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि सेनापती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिव सुहास शंकरदास गांधी (वय ५२) यांनी बुधवारी माले (ता. मुळशी) येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगळवारी (दि. २१) रात्री ११ वाजता गांधी हे नेहमीप्रमाणे घरी झोपण्यासाठी गेले. बुधवारी (दि. २२) सकाळी साडेनऊच्या सुमारास पंख्याला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस नाईक जय पवार पुढील तपास करीत आहेत.
उद्योजक सुहास गांधी यांची आत्महत्या
By admin | Updated: March 24, 2017 03:54 IST