शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर बसचे ब्रेक फेल, सुदैवाने मोठी दुर्घटना, जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:12 IST

मंचर : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस पुणे-नाशिक महामार्गावरून थेट शंभर फूट अंतरावर जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानात शिरली.

मंचर : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस पुणे-नाशिक महामार्गावरून थेट शंभर फूट अंतरावर जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानात शिरली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी मंचर एसटी बस स्थानकासमोर घडली. सुदैवाने रस्त्यात वाहने अथवा नागरिक नसल्याने जीवित हानी झाली नाही. यानिमित्ताने पुणे येथे संतोष माने याने घडविलेल्या घटनेची आठवण नागरिकांना झाली.मंचर-मांदळेवाडी ही एसटी बस (एचएम १२-ईएफ ६३७३) स्थानकातून बाहेर पडत असताना तिचा ब्रेक फेल झाला. एसटीत ५० प्रवासी होते. ते घाबरले. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी बस महामार्गावर सरळ न नेता पूर्वेला वळविली. वेगात असलेली ही बस १०० फूट पुढे जाऊन सीमा पेंट्स या रंगांच्या दुकानाच्या शटरला धडकली. एसटीच्या धडकेने शटरचा खांब वाकला. एसटी बसचा धक्का एका दुचाकीला लागला. सुदैवाने रस्त्यात कोणी नागरिक नव्हता. त्यामुळे जीवित हानी टळली. या भागात सतत वाहने उभी असतात. ती आज तेथे नसल्याने दुर्घटना टळली गेली.रंगांच्या दुकानातील एक कामगार शटरजवळ उभा होता. तो टपरीवर गेला अन् एसटी येऊन धडकली. आपण बालबाल बचावल्याचे त्याने सांगितले. घटनेनंतर बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले, तसेच दत्तप्रसाद गाढवे व इतरतरुण मदतीसाठी धावले. एसटीच्या ब्रेकला हवा भरून ती मागे घेण्यात आली. पोलीस कर्मचारी आल्यानंतर एसटी बस पोलीस ठाण्यातनेण्यात आली.एसटीचालकाने प्रसंगावधान राखल्याची चर्चा नागरिक करीत होते. बस महामार्गाने सरळ गेली असती, तर जीवित हानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.बसचालकाचे प्रसंगावधानरंगांच्या दुकानासमोर एक दुकान आहे. गुरुवार असल्याने ते बंद होते. त्यामुळे गर्दी नव्हती; अन्यथा भयंकर घटना घडली असती.या घटनेने पुणे येथे संतोष माने या चालकाने केलेली घटना अनेकांना आठवली गेली.या एसटी चालकाने मात्र प्रसंगवधान दाखविले. बाहेर येताना ब्रेक फेल झाला. मोकळी जागा दिसल्याने एसटी बस तिकडे वळवली.नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, असे चालक जगन्नाथ भाटेयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे