शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सभागृहनेतेपदी बंडू केमसे

By admin | Updated: April 14, 2015 01:38 IST

महापालिकेच्या सभागृहनेतेपदी शंकर ऊर्फ बंडू केमसे यांची सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवड करण्यात आली आहे

पुणे : महापालिकेच्या सभागृहनेतेपदी शंकर ऊर्फ बंडू केमसे यांची सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवड करण्यात आली आहे. माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी तब्बल चार वर्षे हे पद सांभाळल्यानंतर शनिवारी या पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर आज झालेल्या मुख्य सभेत या पदावर असलेल्या जगताप यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी केमसे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली, तसेच केमसे यांना निवडीचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने केमसे यांचा सत्कार करण्यात आला.केमसे यांनी २००१ ते २००७ या कालावधीत शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे पक्षाचे काम पाहिले. त्यानंतर २००७ च्या महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून पालिकेची निवडणूक लढविली तर, त्यानंतर त्यांनी २०१२ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २९ अ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघातूनही ते इच्छुक होते. कोथरूड परिसर तसेच भुसारी कॉलनीतील नागरिकांच्या पाणी समस्येसाठी केमसे यांनी वेळोवेळी मोठी आंदोलने केल्याने पाणीवालेबाबा म्हणूनही केमसे महापालिकेत ओळखले जातात.सर्वांना सोबत घेऊन काम करणार : केमसे सभागृहनेतेपदाची धुरा सांभाळताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे केमसे यांनी निवडीनंतर मुख्य सभेत बोलताना सांगितले. शहराच्या हिताच्या विरोधात कोणताही निर्णय न घेता, त्यासाठी विरोधी पक्षांची भूमिका योग्य असल्यास वेळ प्रसंगी त्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहण्यासही आपली तयारी असल्याचेही ते या वेळी बोलताना म्हणाले. गेल्या चार वर्षांत शहराच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्याची संधी पक्षामुळे आपल्याला मिळाली. त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, तसेच प्रशासनाची मोठी साथ मिळाली. त्यामुळे या चार वर्षांतील कामगिरीबाबत आपण समाधानी आहोत.- सुभाष जगताप (मावळते सभागृहनेते)