शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको - क्रेडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:58 IST

बांधकाम व्यावसायिकांवर महाराष्ट्र ओनरशिप आॅफ फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा)प्रमाणे केली जाणारी फौजदारी कारवाई आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेप्रकरणी सरसकट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये, याबाबत कॉन्फडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन इंडिया (क्रेडाई) मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सविस्तर पत्र लिहिणार आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिकांवर महाराष्ट्र ओनरशिप आॅफ फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा)प्रमाणे केली जाणारी फौजदारी कारवाई आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेप्रकरणी सरसकट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये, याबाबत कॉन्फडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन इंडिया (क्रेडाई) मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सविस्तर पत्र लिहिणार आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांवरील गुन्ह्यातील कायदेशीर बाबी तपासण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी मागणी त्यात करण्यात येणार असल्याचे क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या पुणे भेटीत बांधकाम व्यावसायिकांनी त्यांची भेट घेतली. तसेच, बांधकाम व्यावसायिकांवर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांविषयी त्यांनी गाºहाणे मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर, बोलताना ‘लोकमत’शी बोलताना कटारिया म्हणाले, ‘‘ग्राहकांची फसवणूक आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेबाबत बांधकाम व्यावसायिकांवर सरसकट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जातआहे. मात्र, या गुन्ह्यासाठीबांधकाम व्यावसायिक खरेच दोषी आहे की नाही, हे पाहिले जात नाही. अनेकदा दिवाणी स्वरूपाचा गुन्हा असला तरी फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.पोलिसांनी कायद्याच्या आधीन राहून कारवाई केली पाहिजे. याचा अर्थ, सर्वच बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी कारावाई करू नये, असे नाही. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप पाहून कारवाई झाली पाहिजे. अनेकदा संबंधित अपघाताशी बांधकाम व्यावसायिकांचा थेट संबंध नसतो. बांधकाम व्यावसायिकांनी संबंधित प्रकल्प दुसºया व्यक्तीला करायला दिलेला असतो. अशा प्रकल्पातील दुर्घटनेबाबतही मूळ बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल होतो.हा प्रकार चुकीचा आहे. पोलिसांनी संबंधित घटनेला बांधकाम व्यावसायिक कितपत जबाबदारआहे, याची खातरजमा करूनच फौजदारी अथवा दिवाणी कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे, असे कटारिया म्हणाले.कायद्याच्या कक्षनुसारच कारवाई व्हावीमोफा कायद्याबाबत कारवाई करतानादेखील ग्राहकाशी केलेल्या कराराची पडताळणी केली जात नाही. ग्राहकाला सदनिकेचा ताबा कधी द्यायचा, खरेदीखत, सोसायटी यांबाबत करारात काय लिहिले आहे, याची शहानिशा न करता कारवाई केली जाते.कायद्याच्या कक्षेनुसारच कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका सातत्याने मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे मांडण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी विशेष विभाग स्थापन केला पाहिजे.कायद्याच्या कक्षेत येणारी कारवाई करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. पुन्हा एकदा याबाबत सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे कटारिया म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड