शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अंदाजपत्रकातील योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:52 IST

दोन वर्षांत भाजपाकडून गाजरच : विकास योजनांचा निधी किरकोळ कामांसाठी पळविला

सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : महापालिकेत पहिल्यांदाच बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाने आपल्या दोन वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये शहराच्या विकासासाठी व पुणेकरांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित केल्या. परंतु गेल्या दोन वर्षांत यापैकी अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या असून, सायकल ट्रॅक, नदीसुधार प्रकल्प, बीआरटी मार्ग, सिंहगड उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीकाठ विकसनसारख्या मोठ्या योजनांचा निधी सत्ताधाऱ्यांनी प्रभागातील किरकोळ कामांसाठी वर्गीकरण करून पळविला आहे. यामुळे सत्ताधाºयांकडून गेल्या दोन वर्षांत पुणेकरांना विविध योजनांचे केवळ ‘गाजर’च दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराचा सर्वांगीण विकास डोळ््यासमोर ठेवून प्रशासन आणि सत्ताधारी दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये विविध योजना प्रस्तावित करतात. महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाने आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावाने पुणेकरांसाठी अनेक योजना प्रस्तावित केल्या. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवसृष्टी, कुंडलिका-वरसगाव योजना, ई-लर्निंग स्कूल, भामा-आसखेड प्रकल्प, योगा केंद्र, मराठी माध्यम मॉडेल स्कूल, समुद्री जैवविविधता केंद्र उभारणे, पांजरपोळ सुरू करणे, ज्येष्ठ नागरिक भवन आदी अनेक योजना प्रस्तावित केल्या. परंतु दोन वर्षे झाली तरी अद्यापही अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. दुसरे अंदाजपत्रक सादर करताना थोडे वास्तवाचे भान ठेवून काही प्रमाणात योजना कमी केल्या खºया, पण प्रस्तावित योजना अस्तित्वात येण्यासाठी प्रशासन व सत्ताधाºयांनी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत.मोठ्या योजनांचा निधी प्रभागातील किरकोळ कामांसाठी पळविला1 अंदाजपत्रकात पूर्व नियोजन करून सायकल ट्रॅक, नदीसुधार प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संवर्धन, बीआरटी मार्ग, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल यासाठी प्रस्तावित केलेला निधी नगरसेवकांनी प्रभागातील सिमेंट रस्ते, विद्युत खांबांची उभारणी, विरंगुळा केंद्र, समाजमंदिर, ड्रेनेजलाईन अशा विविध किरकोळ कामांसाठी पळविण्यात आला आहे.2यामध्ये प्रशासनदेखील मागे नसून, नदीसुधार योजनेअंतर्गत६४ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यासाठी वापरण्यात आला.3घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी मुळा-मुठा नदीकाठ विकसन आणि संवर्धन योजनेतील १० कोटीरुपये वर्ग करण्यात आले आहेत.कोटी शिवसृष्टी, सायकलींचे शहर ओळख परत मिळविण्यासाठी आवश्यक पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५५ कोटी, नदीसुधार प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, सिंहगड रस्ता उड्डाणपूल, तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा, मुलींसाठी अभ्यासिका, मोफत सॅनिटरी नॅपकीन, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, नद्यांवरील पुलांचे सुशोभीकरण अशा अनेक चांगल्या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली. परंतु अंदाजपत्रकातील या बहुतांश योजनादेखील कागदावरच राहिल्या आहेत.प्रशासनाची उदासीनता कारणीभूतलोकप्रतिनिधी या नात्याने शहराचा, लोकांचा विचार करून आम्ही अनेक चांगल्या योजना दोन वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु योजनांसाठी सल्लागार नियुक्त करणे, आराखडे तयार करणे, प्रस्तावांना मान्यता घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु अनेक चांगल्या योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनदेखील केवळ प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव व उदासीनतेमुळे योजना कागदावर राहिल्या आहेत. परंतु पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनासारखी महत्त्वाची योजना प्रत्यक्ष सुरू झाली असून, काही पुणेकरांना लाभदेखील मिळाला आहे. परंतु अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केलेल्या सर्व योजना प्रत्यक्ष सुरू करण्यात येतील. - मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती 

सत्ताधाऱ्यांचे पहिले अंदाजपत्रक (सन २०१७-१८) कागदावरच४अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (सल्लागर नियुक्त)४ससूनच्या धर्तीवर नवीन हॉस्पिटलची उभारणी४सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज४शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीनवीन पर्याय-कुंडलिका-वरसगाव योजना (रद्द)४योग केंद्र४आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहउभारणे.४मराठी माध्यमांचे मॉडेल स्कूल४पांजरपोळ सुरू करणे४ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे४भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करणे

टॅग्स :Puneपुणे