शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकात अठराशे कोटींची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:01 IST

महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात १ हजार ८३१ कोटी रूपयांची तूट येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांना याचा फटका बसणार आहे.

पुणे : महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात १ हजार ८३१ कोटी रूपयांची तूट येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पुढीळ काळात उत्त्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागणार आहे.स्थायी समितीने चालू वर्षाच्या २०१७-१८ या वर्षीच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. पालिकेला मिळालेले उत्पन्न, अपेक्षित खर्च आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. आयुक्त कुणाल कुमार यांनी २०१७-१८ या आर्थिक वषार्साठी सुमारे ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. सुमारे ३९८ कोटींची वाढ करत ५ हजार ९९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा आढावा घेण्यात आला. अंदाजपत्रकात अपेक्षित मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, एलबीटी उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. ३० सप्टेंबर अखेर पर्यत मिळकतकरापोटी ७४८ कोटी, बांधकाम विभागास २०२ कोटी तर एलबीटी विभागास ८६९ कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे. तर इतर अनुदान तसेच वेगवेगळया स्त्रोतादारे सप्टेंबर २०१७ अखेर पालिकेच्या तिजोरीत सुमारे २१३१ कोटींचा महसूल जमा झाला आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षात ४ हजार १६७ कोटी रूपयांचे उत्पन्न पालिकेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल १हजार ८३१ कोटीची विक्रमी तुट येणार आहे.पालिकेला सुमारे २६०० कोटी हे पगार तसेच देखभाल दुरूस्तीवर खर्च होणार आहेत. तर उर्वरीत १६०० कोटींमध्ये ४०० कोटींची कामे सुरू असून मार्च २०१८ अखेर पर्यंत अवघे १२०० कोटीच विकासकामांसाठी शिल्लक असणार आहे.