शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी समितीचे कामही धीम्या गतीने; पाच महिन्यांत केवळ तीन बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:08 IST

शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत

पुणे : शहरातील विविध बीआरटी मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआरटी देखभाल-दुरूस्ती समितीचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. शहरातील बहुतेक बीआरटी मार्ग अपूर्णावस्थेत असून मागील काही वर्षांपासून केवळ डागडुजी केली जात आहे. त्यात सुधारणासाठी नेमण्यात आलेली समितीच या वाटेने जात असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील स्वारगेट-कात्रज हा पहिला पथदर्शी बीआरटी मार्ग अनेक वर्षांनंतरही बाल्यावस्थेतच आहे. सध्या या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. शहरातील नगर रस्ता, संगमवाडी रस्ता, सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गही अर्धवट आहेत.काही मार्गांची दुरवस्था झाली असून प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीची स्थापना करूनपाच महिने उलटले आहेत. बीआरटी मार्गांची पाहणी करून त्यातील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्याची जबाबदारी या समितीवर आहे. पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पथविभातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पीएमपीतील काही अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीची स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच नगर रस्त्यावरील बीआरटीची पाहणी केली. तर आतापर्यंत पाच महिन्यांत तीन बैठका झाल्या आहेत. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. समितीने केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. सूचनांचा गांभीर्याने विचार न करता केवळ डागडुजी करून कामे पुढे ढकलली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.प्रशासन बीआरटी समितीबाबत उदासीन असून अशी बुजगावणे बनलेली समितीच नको, अशा शब्दांत समितीचे सदस्य आणि पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीला पालिका आयुक्तही हवेतबीआरटी मार्गांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याची गरज आहे. या अहवालामध्ये प्रत्येक मार्गावर असलेल्या त्रुटी व त्यावरील उपाययोजना, त्याचा कालावधी याचा समावेश असायला हवा. तसेच पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत समितीची बैठक व्हायला हवी. सूचनांचा विचारच होत नसेल तर समितीचा काहीही उपयोग होणार नाही.- जुगल राठी, समितीचे सदस्य

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूक